सोमवार, २८ एप्रिल, २००८

माझी चीडण्याची कारणे (भाग 1)

मला ना एकदा मुद्देसुद सांगुन ही कोणाच्या डोक्यात शीरले नाहीं ना की खरच तो माणूस डोक्यात जातो. मग लोक म्हणतात हा चीड्तो ,

बस मधे पुढे उभे रहायला जागा असतानाही मागे मागे राहणारी माणसे पाहीली की माझे डोके जाते. आता माला सांगा पुदून उतरायचे असा नीयम असताना, पुढे जागा रिकामी असताना ही माणसे आयुष्यात रहावे तसे बस मधे मागे मागे का राहतात? मग लोक म्हणतात हा चीड्तो

रिक्शा वाले जेंव्हा जवळचे भाडे नाकारतात तेंव्हा त्यांची पूजा मी नाही करू शकत, आणि जेंव्हा ते नकारा बरोबर तुछता दर्शक चेहरा करतात तेंवा मात्र मी त्यांची आxx ब xx् न एक करतो , का करू नये सांगाना? मला पटवून द्याना ? आणी "ती रिक्शा सोडून दूसरी रिक्शा पकडायची " असे हजार लोकानी ढुन्गण पुसलेल्या मल्कट चींधी सारखे उत्तर देऊ नका अरे हा काय उपाय आहे का ? मग लोक म्हणतात हा चीड्तो

फिल्मी गाणी लाउन त्या वर मर मरे पर्यंत हुबेहब नाचायचे, अरे हा काय तमाशा लावालाय टीवी वर , चीडायला मला एक कारण मिलते, तो कार्यक्रम चालू असताना मी घरी गेलो की घरच्या लोकांच्या चेहरयावर काळखी येते. ते रेटून मला विरोध करतात, कुठल्या तरी चैनल वर लागलेला पुष्पक किंवा सदाबहार अप्पू राजा किंवा एखादा तसाच कार्यक्रम मला त्याना दाखवायचा असतो पण घरातली माणसे , काय काय गलीच्छ बघत असतात , (आमची एक आजी टीवी वर कोणी ही नाचायला लागला ना की काय हा "ही्जड़खाना" लाव्लाय असे म्हणते,) तर तसा नाचाचा तो खाना , सदा तोंड काले (स्वतःचे आणी दुसर्यांचे ही ) करायला उत्सुक असणार्या स्त्री पुरुषानी आणी जास्तच हुशार असणार्या कारट्या नी तुम्बलेल्या, मागे zooom zooom असे पाश्र्व संगीत असणार्या सिरिअल्स मोठा आवाज करून बघत असतात, ट्रेन मधून हाडे गोला करून घरी आलेल्या माणसाला जर फ़क्त जूम जूम आवाज सतत कानावर पडू लागला तर माणसाचे डोके नहीं फिरणार? मग लोक म्हणतात हा चीड्तो

कदाचित तुमची पण हीच करणे असू शकतील चीडण्याची ? काय नाहीत ? ही कारणे नाहीत ? तुमच्या तर ......... बघितलत मग लोक म्हणतात हा चीड्तो