रविवार, २८ डिसेंबर, २००८

खल्लास नाय पायजेल झिग झिग !!!


गुरुवार, १८ डिसेंबर, २००८

गझनी चे विषारी गाणे

आज मी जाम खुश आहे... का ते माहित नाही... मराठीत डायरेक्ट लिहायला खुप मजा येतेय... म्हणून असेल नाहीतर आज अच्युत पालव सरांना भेटून आणि त्यांचे Callifest exhibtion पाहून आलो असेन म्हणून ... किंवा ए आर रहमान चे परत एक गाणे स्लो poision सारखे चढले असेल म्हणून... असेल काही ही ... पण मजा येतेय ...

रहमान विषयी खुप लिहायचे आहे... खुप आहे... अगदी आमच्या लहानपणापासून लिहावे लागेल... लहान पणी आम्ही कॉलेज मधे होतो तेंव्हा पासून... आम्ही म्हणजे मी आणि माझे मित्र... ज्यातले अजुन २ जणच रहमान फ्यान उरलेत... बाकीचे practicle झाले...

मी सांगत होतो रहमान च्या गाण्या बद्दल चित्रपट गझनी , गाणे "बहेका बहेका "... पहिल्यांदा ऐकला तेंव्हा अति सामान्य वाटल... ते नेहमीच वाटत... पण तो guitar चा अणि saxphone चा तुकडा संपला की जी चाल दिलीय ना त्याने विष चढत गेल... त्या चाली साठी परत परत ऐकल... परत परत...परत परत

"धड़कन धक् धक् धक् हुई .... दिल था था था थय .... चाल डग मग डग मग हुई"
च्यायला काय येड्या सारखी चाल आहे पण काहीतरी मस्त आहे त्यात ...

आणि "गुजरे जहांसे वो ... पासून ... "मुजको भिगोती जाए" ..नंतर जे काय चालू होते ते म्हणजे बेक्कार ... मस्त
नंतर माझे हात आपोआप ड्रम वाजवायला लागतात .... धमाल नुसती .... च्यायला ... रहमान पण काहीतरीच आहे ... गाण्या चे काय करून टाकतो ... बेक्कार.... ( बेक्कार म्हणजे अति उत्तम माझ्या भाषेत )
"खट्टा सा बचपन , थोडी शरारत" या वेळी ... ड्रम बघितले कसले बड्वलेत ... मग मी रहमानला नेहमी सारखा शरण जातो ... डोंगरावर जाउन त्याला सलाम करतो ... गाण्याच्या ओळी मोठ मोठयाने ओरडतो ... अंगाची मळणि करतो... विष चढल्यावर माणुस कसा करतो तसा करतो... काय करणार ... कराव लागत ... शेवटी ते रहमान चे गाणे असते ... स्लो poison...

त्याच्या गाण्यावर नाही नाचणार मग कोणाच्या नाचू आनंद राज आनंद च्या की गेला बाजार अनु मालिक च्या ?

गूगल भाषांतराची गोष्ट

च्या आयला मी येड्या सारखा कितीतरी दिवस transliteration बटन माझ्या पोस्टिंग विण्डो मधे का येत नाही म्हणून शोधत होतो ... फॉरम मधे मेल टाकले, देवा जवळ प्रार्थना केली (फुल स्टॉप नाही देता येत वाटत या मोड madhe) आणि शेवटी बघतो तर काय मी माझे पोस्ट edit html मोड मधे जाउन बनवत होतो ... compose वर क्लिक केला तर आला ना तो "अ" ... मजा आ गाया साला !!! आता नवस फेडावे लागणार. :)