बुधवार, २८ जानेवारी, २००९

पुन्हा ए .आर .रहमान

तुम्हाला सांगतो माझ आयुष्य या माणसाने जवळ जवळ ७५% तरी व्यापलाय...ARRahman

आम्ही मित्र पाटकर कॉलेज मधे शिकत होतो (शिकत म्हणजे सकाळी जायचो ... दुपारी परत घरी यायचो) मधल्या वेळात आम्ही काय काय प्रताप करायचो ते आमचे आम्हाला माहित... त्याला जर तुम्ही शिकणे म्हणत असाल तर म्हणा ... माझा काय जातय. हा तर कॉलेज मधे आम्ही विचित्र म्हणून गणले जात असू ... म्हणजे आमच्या एका हातात सदैव एक cassette (अर्थात arr chi) अणि एका हातात पुस्तक... पुस्तकांचा भयानक नाद होता मला ... आता ही आहे...

त्या वेळी आम्ही गाणी बिणि ऐकायचो पण कोणतीही .... choice वैगरे म्हणतात ना? तसले काही नवते... पार अनु मालिक , नादिम श्रवण वैगरे पण ऐकायचो... (ते वाईट संगीत देतात असे काही नाही... चांगले वाईट सर्व आपल्या मानन्यावर वर असते... रहमान आइकायला लागल्यावर आम्हाला कळले आम्ही किती सुमार दर्ज्याची सिनेमा गीते आइकय्चो ते ... ) त्या वेळी रोजा आला... लोकसत्तात त्याच्या परीक्षाणात लिहिले होते की याची गाणी फार वेगळी आणि गोड़ आहेत म्हणून... मग काय आम्ही सिनेमे वेड़े होतोच (अजुन ही आहोत ) पाहिला पिक्चर आणि काय सांगू च्यायला .... पुरी वाट लागली ... तसा actully लगेच काही प्रभाव वैगरे नव्हता पण एका शिळ्या दुपारी बडबड करत असताना आमच्या म्हणजे (मी , संजीव सैद , आणि अंकुश कदम) डोक्यात रोजा ची गाणी वाजायला लागली ... मला अजुन आठवतय आम्ही "ये हसीं वादियाँ " ची music आहे ना ? ती तशीच्या तशी तोंडाने म्हणायची कोशिश करू लागलो (आठवा त्याची सुरुवात) कुठे तरी थंडगार जागेत गेल्यावर वाटत ते ऐकून ॥ मग एका मागोमाग एक सुरावटी आम्ही आठवायचा प्रयत्न आम्ही करू लागलो, "दिल है छोटासा " "रोजा जानेमन " "भारत हम को " एकसे एक अगदी दगिन्यानी लखलखणारा बॉक्स असतो ना तशी होती रोजा ची cassette... मग ती विकत घेतली .... त्याचे कवर पण काय लालमलाल होते ... माज्या टू इन one वर ती लावली ... आणि काय सांगू ? जे काय सुरु झाल ... (आठवा दिल है छोटासा ची suruvat) मला वाटत तो जो काय sound होता, तो सर्वस्वी नवा होता आम्हाला... हिन्दी मराठी इंग्लिश कुठेच असला sound एकला नव्हता ... तुम्ही आता ही ऐका तुम्हाला पटेल मी काय म्हणतोय ते... बरा sound वेगला होताच पण गाण्याचे orchestration पाहिलात कसल केलय ते ... फक्त स्ट्रिंग्स , घुमणारा बास गितार, मिनमिनी आशा गोड़ नावाच्या गयिकेचा आवाज ढोलकी नाही .... कसला ठेका नाही ... वेगळ , वेगळ होता त्यात काहीतरी... आणि सगळ्यात कहर म्हणजे माझी भक्ति रहमान वर कधी जडली माहितेय ... जेंवा ते "येलेलो येले येलेलो "एकला तेंव्हा, नंतर मला वाटल की हा कोणीतरी वयस्कर , दाढ़ी बीढ़ी वाढवलेला बुड्ढा बाबा असेल ... national award घेताना पाहिला तर हा आमच्या सारखाच एक मूलगा ... भयानक लाजनारा ... कमी बोलणारा ... पण म्यूजिक देताना कुठे जात असेल हे सगले साधेपण ? मी, संजीव आणि विजय (काडू) अजुन ही त्याचे चाहते (चाहते फार boaring shabd ) आहोत... आमचा एक दिवस ही जात नसेल ज्या दिवशी आम्ही त्याच्या विषयी बोलत नाही... (आमचे आवडते विषय म्हणजे शिवाजी महाराज , पानीपत, भूते , सिनेमे आणि रहमान ) जवळ जवळ १५ वर्ष झाली असतील रोजा ऐकून ... आजुन ही आम्ही रहमांच्या प्रभावाखाली जगतोय ।

तर रोजा ने आमच्या डोक्यात घर केल्यावर आम्ही रहमान च्या नविन एल्बम च्या शोधत होतो ... काही तमिल
कैसेट शॉप वल्यानी सांगितले की "thiruda thiruda" नावाचा एक नविन मूवी आलाय। तो एकला आणि रहमान पूर्णपणे डोक्यात , मनात पार रूजत गेला। तो जो काय एक कोम्ब होता ... छोटासा हिरवा ... तो फोफवुन त्याचे आता सदाहरित अरण्य झालय... कधीतरी फेरफटका मारू त्यात ... थिरुडा थिरुडा मधे काय भरल होत अस ? ते पुढच्या भागात ...

चला आता थोड़े काम करू :)

५ टिप्पण्या:

Arvind म्हणाले...

Hey harshal..

Nice to see you are back on track...
Post is Awesome...
I am also a great fan of A R...
He is gem..and keep up the good work... :)

bheeshoom म्हणाले...

आम्ही रेहमानला "देव" च म्हणतो.
म्हणजे देवाने संगीत दिलयं. देवाचं गाणं आहे वगैरे!

तो देवच रे!!!

Harshal म्हणाले...

:)mast ani thnx for comments ... comments naslya ki ase vatte yedyasarkha ektach badbadtoy.... kalokhat ...

me म्हणाले...

lihita zaakas!! pan bhasheche wande aahet raw! baraha direct ha font try kara may be help hoil :)

me म्हणाले...

hii, baraha dowmload kelya nantar to run kara , tya natar tumhala baraha direct mhanun je icon disel tya war double click kara, ujawyaa hatala koparyat, khali task bar war ek chaukoni icon yeil , tyat marathi he bhasha select kara. (marathi/unicode)ani phonetic lihayala suruwat kara. aanakhin kahi mahiti hawi asel tar wikipedia war ek artical aahe te wacha. happy bloging :)