सोमवार, २३ फेब्रुवारी, २००९

मी पेढे वाटतो

सोमवारी ऑफिसला जाताना गाडीत असताना मित्रांचे फ़ोन आले ... congratulations.... अभिनन्दन ....
माला कळले...तड़क मिठाईवाल्याकडे गेलो... १ किलो पढे घेतले... ऑफिस मधे येउन दप्तर ठेवले ... सर्वाना पेढे वाटले ... पहिल्यांदा लोकाना कळेना ... त्याना वाटले मला मुलगाच झाला की काय? कही लोक कारण ऐकून wow !thts the स्पिरिट म्हणाले ..... काही लोकानी भुवया उंचावुन माज्यकडे पाहिले ... सगलेच आश्र्याचाकित झाले ... मी असे काय मोठेसे केले होते? १५/१६ वर्षा पूर्वी होणारी गोष्ट आज झाली होती... म्हणून मी पेढे वाटले होते...

रहमान ला एक नव्हे २ oscars मिळाले होते... माणुस वेडा नाही होणार? पेढे नाही वाटणार? आता नाही वाटायचे तर कधी वाटायचे...? जय हो रहमान बाबा की ...

बुधवार, ११ फेब्रुवारी, २००९

माझ्या काही महत्वाकांक्षा

माझ्या काही महत्वाकांक्षा, इच्छा, ज्या पूर्ण करणे ... फक्त माझ्या आणि माझ्यावरच अवलंबून आहे

१) एक high end SLR कैमरा घेणे...
२) माझी बरेच दिवस रखडलेली माझी documentry "कोकणातली भूते" ची पुर्वतयारी चालू करणे.
३) कार मधे जुनी ऑडियो system काढून ... नविन बसविणे .
४) ऑटो रिक्शाचा वापर टाळुन बस अणि रेलवे ने येणे जाणे करून वाय्फाळ खर्च टाळणे॥
५) नविन rajor घेणे... (१ महिन्या पासून विचार करतोय घेऊ घेऊ ...)
६) कदम नावाच्या मित्रा बरोबर कोल्ह्पुर - पावन खिन्ड ते विशाल गड असा प्रवास करणे। (आम्ही दोघे तथाकथित शिव प्रेमी आहोत.)
७) दुपारच्या वेळी झाडा खाली मस्त झोपणे

सध्या एव्ढ्यच आठवतायत ... बाकि उदया हँ !!!!

मंगळवार, १० फेब्रुवारी, २००९

इअर फ़ोन हरवला

च्यायला आज माझा इअर फ़ोन हरवला ... खुप वाईट झाल... दिवसातला quality टाइम मी ज्याच्या सहाय्याने घालवायचो तो माझा इअर फ़ोन नेला कोणीतरी माज्या ऑफिस डेस्क वरुन... खुप सर्च करून मी तो मिळवला होता क्रिएटिव ep ६३० ... (किंमत : ९००/-)...

पूर्वी असे काही झाले की मनाला प्रचंड मनस्ताप करून घ्यायचो... काल्पनिक चोराला खुप शिव्या द्यायचो... पण हल्ली तसे नही करत... आपले काही नुकसान झालाय असे समजल्यावर हल्ली मी दुःख नाही करत बसत ... जास्तीत जास्त ५ मींनिटे त्याचे दुःख होते .... मग मन आपोआप काही गोष्ट करते ... म्हणजे पहिली शोधा शोध ... लोकाना विचारणे ... त्यात पण अपयश आला की मग मी थांबतो... गोष्ट हरवली ना ... जाऊ दे ... आपण नविन घेऊ ... कारण गेलेली गोष्ट मनस्ताप केल्याने काही परत येणार नसते ... मग ती परत विकत घेण्याचे प्लान मी करू लागतो ... कारण माज्या हातात तीच गोष्ट असते...

सध्या डॉ आनंद नाडकर्णी चे मानस शास्त्र वरचे पुस्तक "स्वभाव विभाव " वाचतोय ... खुप मस्त पुस्तक आहे। त्यात लिहीलय ... प्रतेक त्रासदायक परिस्थिति मधे २ गोष्टी असतात .... १) आपल्या कंट्रोल मधे असलेल्या गोष्टी २) आपल्या कंट्रोल च्या बाहेर असलेल्या गोष्टी ...

कंट्रोल बाहेर च्या गोष्टी आपल्या हातात नसतात तेंव्हा त्यावर तुम्ही किती ही डोके फोड़ करा त्रास आपल्याला असतो... तेंव्हा अशा हाइपर situation ला थोड़ा थांबा ... कंट्रोल चा विचार करा... सर्व परिस्थिति सामान्य होते...

आणि एक महत्वाचे ... हे सगळे केल्यावर तुमचे दुःख दूर होइल वैगरे काही नाही ... कारण आपण माणसे आहोत ... दुःख होणारच ... पण त्याचा जास्त बाऊ करून घेऊ नका ... दुखाचा ढग मनाच्या आभाळा वर आला की त्याला जास्त रेंगाळु देऊ नका ... त्या एका ढगाने अख्ख आकाश काळवंडू देऊ नका... ढग जसा आला तसाच निघून ही जाइल त्याचा स्पीड वाढवणे ... थाम्बवणे सर्वस्वी तुमच्याच हातात आहे .

बर्र माझा इअर फ़ोन कुठे सापडला तर मला कळवायला विसरु नका ... :)

सोमवार, ९ फेब्रुवारी, २००९

बालपण

काल एक मित्राचा लहानपणाचा किस्सा एकला ... त्या माज्या मित्राला त्याचे पालक , नातलग नेहमी जसे लहान मुलाना विचारतात तसे विचारायचे "मोठा झाल्यावर तू कोण होणार?" तेंव्हा मित्र म्हणायचा"मी इंजिनियर होणार "
(आताच्या काळात हे उत्तर सामान्य वाटले तरी त्यावेळी, नोकरदार मध्यमवर्गीय लोकात ते उत्तर फार कौतुकाचे होते ) मग पालक , नातलग सर्वजण खुश व्हायचे... वा किती "दूरदृष्टिचा आणि महत्वकांक्षी मुलगा आहे हो तुमचा" असे संवाद व्हायचे... मुलगा पण खुश असायचा...

पण खरी गंमत वेगळिच होती.माज्या त्या मित्राला इंजिनियर म्हणजे (सिविल, ऑटोमोबाइल ) असला eng..डोक्यात नव्हता...

त्याला रेलवे खुप आवडायची ... शिटि मारत , धुर सोडत जाणारे engine आणि त्यात बसणारा त्याचा ड्राईवर याची त्याला भयंकर क्रेज होती। त्याच्या बालमनाला वाटायचे engine चालवणारा तो "इंजिनियर ".म्हणून कोणी विचारला कोण होणार की तो निरागसपणे (लहानपणि सगळेच निरागस असतात म्हणा... आत्ता तो ....... असो ... )
सांगायचा मी ना? "मी इंजिनियर होणार"

किती भोळ्या समजुती असतात ना लहानपणी ? सगळा जग तेंव्हा किती मजेमजेचे ... सरळ ... सोपे वाटायचे...
कुठे गेले ते जग ? ते वेडे बालपण आणि बालमन ... त्या मित्राचेच नव्हे ... माझे ... तुमचे, आपल्या सगळ्यांचे ...

गुरुवार, ५ फेब्रुवारी, २००९

वेळ

खुप खुप लिहायचे .... पण वेळ मिळत नाही... तरी वेळात वेळ काढून हे एवढा तरी लिहिलय :)