सोमवार, ९ फेब्रुवारी, २००९

बालपण

काल एक मित्राचा लहानपणाचा किस्सा एकला ... त्या माज्या मित्राला त्याचे पालक , नातलग नेहमी जसे लहान मुलाना विचारतात तसे विचारायचे "मोठा झाल्यावर तू कोण होणार?" तेंव्हा मित्र म्हणायचा"मी इंजिनियर होणार "
(आताच्या काळात हे उत्तर सामान्य वाटले तरी त्यावेळी, नोकरदार मध्यमवर्गीय लोकात ते उत्तर फार कौतुकाचे होते ) मग पालक , नातलग सर्वजण खुश व्हायचे... वा किती "दूरदृष्टिचा आणि महत्वकांक्षी मुलगा आहे हो तुमचा" असे संवाद व्हायचे... मुलगा पण खुश असायचा...

पण खरी गंमत वेगळिच होती.माज्या त्या मित्राला इंजिनियर म्हणजे (सिविल, ऑटोमोबाइल ) असला eng..डोक्यात नव्हता...

त्याला रेलवे खुप आवडायची ... शिटि मारत , धुर सोडत जाणारे engine आणि त्यात बसणारा त्याचा ड्राईवर याची त्याला भयंकर क्रेज होती। त्याच्या बालमनाला वाटायचे engine चालवणारा तो "इंजिनियर ".म्हणून कोणी विचारला कोण होणार की तो निरागसपणे (लहानपणि सगळेच निरागस असतात म्हणा... आत्ता तो ....... असो ... )
सांगायचा मी ना? "मी इंजिनियर होणार"

किती भोळ्या समजुती असतात ना लहानपणी ? सगळा जग तेंव्हा किती मजेमजेचे ... सरळ ... सोपे वाटायचे...
कुठे गेले ते जग ? ते वेडे बालपण आणि बालमन ... त्या मित्राचेच नव्हे ... माझे ... तुमचे, आपल्या सगळ्यांचे ...

३ टिप्पण्या:

अनामित म्हणाले...

खरे आहे भावा. लहानपणी सगळेच निरागस असतात. मला सुध्दा इंजिनियर व्हावे असे वाटायचे. पण त्यावेळी इंजिनियर म्हणजे मोठ्मोठ्या इमारती आणि घरे बांधणारा अशी आमची समजूत होती.

छान वाटले त्या जुन्या आठवणिना उजाळा देऊन.

चियर्स
सुदर्शन

Harshal म्हणाले...

mala police inspector vyayche hote.
ani mi jhalo designer. atta bola :)

Sud ... thnx for your kind words.

Harshal

सागर म्हणाले...

सव्वा वाजत आला आहे.पहिल्या पोस्ट पासून सर्व पोस्ट वाचतोय
बघतोय
बाजीराव आवडला आपल्याला