मंगळवार, १० फेब्रुवारी, २००९

इअर फ़ोन हरवला

च्यायला आज माझा इअर फ़ोन हरवला ... खुप वाईट झाल... दिवसातला quality टाइम मी ज्याच्या सहाय्याने घालवायचो तो माझा इअर फ़ोन नेला कोणीतरी माज्या ऑफिस डेस्क वरुन... खुप सर्च करून मी तो मिळवला होता क्रिएटिव ep ६३० ... (किंमत : ९००/-)...

पूर्वी असे काही झाले की मनाला प्रचंड मनस्ताप करून घ्यायचो... काल्पनिक चोराला खुप शिव्या द्यायचो... पण हल्ली तसे नही करत... आपले काही नुकसान झालाय असे समजल्यावर हल्ली मी दुःख नाही करत बसत ... जास्तीत जास्त ५ मींनिटे त्याचे दुःख होते .... मग मन आपोआप काही गोष्ट करते ... म्हणजे पहिली शोधा शोध ... लोकाना विचारणे ... त्यात पण अपयश आला की मग मी थांबतो... गोष्ट हरवली ना ... जाऊ दे ... आपण नविन घेऊ ... कारण गेलेली गोष्ट मनस्ताप केल्याने काही परत येणार नसते ... मग ती परत विकत घेण्याचे प्लान मी करू लागतो ... कारण माज्या हातात तीच गोष्ट असते...

सध्या डॉ आनंद नाडकर्णी चे मानस शास्त्र वरचे पुस्तक "स्वभाव विभाव " वाचतोय ... खुप मस्त पुस्तक आहे। त्यात लिहीलय ... प्रतेक त्रासदायक परिस्थिति मधे २ गोष्टी असतात .... १) आपल्या कंट्रोल मधे असलेल्या गोष्टी २) आपल्या कंट्रोल च्या बाहेर असलेल्या गोष्टी ...

कंट्रोल बाहेर च्या गोष्टी आपल्या हातात नसतात तेंव्हा त्यावर तुम्ही किती ही डोके फोड़ करा त्रास आपल्याला असतो... तेंव्हा अशा हाइपर situation ला थोड़ा थांबा ... कंट्रोल चा विचार करा... सर्व परिस्थिति सामान्य होते...

आणि एक महत्वाचे ... हे सगळे केल्यावर तुमचे दुःख दूर होइल वैगरे काही नाही ... कारण आपण माणसे आहोत ... दुःख होणारच ... पण त्याचा जास्त बाऊ करून घेऊ नका ... दुखाचा ढग मनाच्या आभाळा वर आला की त्याला जास्त रेंगाळु देऊ नका ... त्या एका ढगाने अख्ख आकाश काळवंडू देऊ नका... ढग जसा आला तसाच निघून ही जाइल त्याचा स्पीड वाढवणे ... थाम्बवणे सर्वस्वी तुमच्याच हातात आहे .

बर्र माझा इअर फ़ोन कुठे सापडला तर मला कळवायला विसरु नका ... :)

६ टिप्पण्या:

अमोल केळकर म्हणाले...

खूप छान पोस्ट. जीवनातील कठीण परिस्थिती कशी हाताळावी याचा सोपा उपाय दिला आहे आपण.

असेच लिखाण येऊ दे. वाचायला आवडेल

आपला

अमोल

Harshal म्हणाले...

thnx amol.... feeback ala tar khup bare vatte...

Thnx to Dr.Anand Nadkarni too !

अनामित म्हणाले...

chaan lihilay......

parat asle post vachayala bhaari watateen.....

Arvind म्हणाले...

mast re Harshal...
ekdam mast post...

Harshal म्हणाले...

thnx thnx thnx arvind abhishek amol... sarvana dhanyawaad...

Satish म्हणाले...

सही रे हर्षल!