रविवार, २९ मार्च, २००९

कं टा ळा / टिर टिर आणि बरच काही

माला दिवसातून खुप वेळा कं टा ळा येतो... त्यमुळेच ब्लॉग वर काही लिहिता येत नही। खुप प्रसंग असतात लिहिण्यासारखे पण असे वाटते का लिहावेत ते ब्लॉग वर... बर्र ब्लॉग पण माझ्यासाठीच आहे ना? माझे अनुभव मी मलाच का सांगावेत परत, ते पण लिहून ... लिहिता लिहिता ते अनुभव कागदावर काही उतरत नाहीत जसे च्या तसे
आणि ते खोट खोटे ... आव आणून लिहिणे मी हल्ली बंद केलाय. म्हणजे पूर्वी लिहिले ते खोटे होते असे नही। पण त्यात लोकाना आवडेल का ? त्याला कमेन्ट मिलतिल का वैगरे विचार असायचे। लिहिताना मी नेहमी कोणाची तरी स्टाइल वापरायचा प्रयत्न करायचो... म्हणजे मी वाचलेल्या अणि आवडलेल्या लेखकांचा पण तसे कधीच लिहायला जमलेले नाही ... त्या मुळे आता ठरवलय स्वाथाशीच गप्पा मारल्या प्रमाणे लिहायचे. कधी जगाचे सर्व टेंशन आपल्यावर असल्यासारखे, कधी निर्लज्ज पणे... कधी वात्रट पणे... कधी बुद्धू माणसा प्रमाणे, थोडक्यात एक माणुस आपल्या सर्व तथाकथित गुण दोष ओलखुन लिहिल त्या प्रमाणे ... कसलाही आव ना आणता...
(काय च्यायला आव आव आणि काव काव लावलीय ... मघा पासना... हो पण आवे वरुन शौचा शी संबधित जोक मी नाही करणार ... )

लिहिण्याची नविन शैली बिली सापड़लिय ह्या गैरसम्जुतित राहून ही टिर टिर आता बंद करतो ...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: