गुरुवार, २३ एप्रिल, २००९

"मी शिवाजी राजे भोसले बोलतोय "

पहायचा, पहायचा अस बरेच दिवस मानत होत... शेवटी पहिला...

पहिल्या दिवशी गेलो तर सिनेमा हौसफुल होता .... जरा वाईट वाटल... पण एक माला आवड्ल ते म्हणजे multiplex मधे शनिवारी पण मराठी सिनेमा जोरात चालतोय ते ... म्हंटला बघुया नंतर... काही बिघडत नाही ...

सिनेमा म्हणजे आपला जिव की प्राण ... त्यात थोरल्या महाराजांच्या नावावर काढलेला सिनेमा म्हणजे पहायलाच हवा होता ... सिनेमा आवडला ... ज्या काय थोड्या माफक अपेक्षा होत्या त्या पूर्ण झाल्या ... मांजरेकर कडून किती अपेक्षा ठेवणार ? मराठीतला माझा अजुन पर्यंतचा आवडता सिनेमा "डोम्बिवली फास्ट "।

हल्ली मराठी सिनेमात पूर्वी पेक्षा चांगला चकचकीतपणा येतोय... तबला सितार बासरी यात अडकलेल्या मराठी संगीतात नविन आधुनिक प्रयोग होतायत ... (सामान्यांच्या भाषेत एक वाक्यात सांगायचे तर ) एकंदर मराठी सिनेमा ची quality सुधर्तेय...

मशिराभोबो मधे काही गोष्टी मला नाही आवडल्या ... सिनेमात मराठी माणसावर अन्याय झालाय ... त्याला सगळे कमी लेखता आहेत .... हे एवढे परिणाम कारक नाही दाखवलेले ... सचिन खेडेकर हा काही घाबराट वैगरे नाही वाटत ... तो तर मला पहिल्या पासून कडक्च वाटला ... (शेवटी सिनेमा हा दिग्दर्शकाचा असतो ... कदाचित त्याला तसाच दाखवायचे असेल... आपण कुठ्यला mindset ने ते बघतो त्यावर आपले interpretation अवल्म्बुन असते... ) शिवाजी राजांचा घोड़ा फारच पुचाट वाटला ... शेवटी खेडेकरांची मुलगी साईट हयाक करते ते फार हास्यास्पद आहे...असो...

आवडलेल्या गोष्टी म्हणजे... सिनेमाची कल्पना (मध्यवर्ती ... का काय म्हणतात ना ती ...) लय भन्नाट !
मराठी कलाकारांची acting (त्यात कोणाचे ही दुमत नाही... ) लय भन्नाट !
fusion केलेला अफझल खान वधाचा पोवाडा ...मस्तच ... (असे खुप यायाल हव हो मराठी मधे)
चटपाटित संवाद ... मस्त

आणि महेश मांजरेकर, महाराजांच्या वेशात कड़क दिसतात .... काही लोक बोलतात की मांजरेकर म्हातारे वैगरे दिसतात पण त्यात काय दम नाही ... च्यायला हे लोक काय बघायला गेले होते काय खरे शिवाजी महाराज अमुक अमुक वयात असे दिसत होते ते ... कोणाला माहिती आहे का ते खरेच कसे दिसत होते ते... ?

अरे आपण लोकल मधे जाऊन येउन इतके थकतो की ३० मधेच ५० चे वाटायला लागतो... आणि महाराजांसारखा
एवढा मोठा माणूस ज्याने आपली उभी हयात घोड्यावर ... सह्याद्रीच्या उन पावसात काढली ... कित्येक लढाया केल्या... ते काय गोरे गोरे .... गुट गुटित... गोड गोड दिसणार आहेत? ते रापलेले आणि राकट दिसायला हवेत... (हे सर्व माझे interpretation)...

तर सांगायची गोष्ट अशी की काही ही पुचाट कारणे न देता ... हा सिनेमा बघा... मोठ्या पडद्यावरच बघा अणि मग काय ते बोला...

गुरुवार, १६ एप्रिल, २००९

कसाब बाळा ... उगी उगी

कसाब्च्या एक एक बातम्या ऐक्ल्यात ना? येड्या सारखा हसतो काय? आपल्या न्याय व्यवस्थे ला हसतो की काय तो? तो मनात म्हणत असेल काय येड झवे लोक आहेत भारतातले ... मी यांच्या छाताडा वर थया थया नाचत गोळिबार केला , निरपराध लोकाना झुरळ मारावित तसे मारले... यांच्या डोळ्यासमोर रक्त मासाचा चिखल करून दाखवला... आणि ही माणसे अजुन पुरावे गोळा करतायत... एखाद्या वेड्या माणसाने न दिसणारा कचरा गोळा
करावा तसा ... पेपर काय वाचायला मागतो... मग न्यायमूर्ति त्याला आश्वासन पण देतात .... कसाब माझ्या बाळा ... उगी उगी ... कायद्यात बसत असेल तर देऊ हा आम्ही तुला पेपर... उद्या तो कायद्यात काय काय बसवेल आणि कोणाच्या तरी घरात जाउन झोपेल ... मी तर म्हणतो त्याच्या आई वडिलांना विचारून त्याच्या साठी एखादी मुलगी बघा म्हणावे... लग्न उरकून टाकू... VT स्टेशन वर मंडप उभारू ... मुलगा लग्ना नंतर तरी सुधारतो का बघू... जबाबदारी येइल मग कुठला वेळ मिळेल त्याला लोक मारायला ...

त्याचा काय भरवसा नाही निवडणुक लढवायला मागायचा तो ... मग कायदा पण म्हणेल कसाब माझ्या बाळा ... उगी उगी ... कायद्यात बसत असेल तर देऊ हो आम्ही तुला लढवायला ...

काय चाललय हे ? हे असले कायदे बदलायला नकोत...? काही हुशार टाळकी बसवून अशा परिस्थित योग्य आणि तत्पर न्याय निवडा होण्यासाठी काहीतरी करा ना? हे असले कायदे बदलायला कसले प्रोब्लेम्स असतात हो?
आणि म्हणे महासत्ता ? डोम्ब्लाची महासत्ता ?

सोमवार, ६ एप्रिल, २००९

कही येड्च्याप माणसे

साधारण रोजच्या आपल्या जगण्यात आपल्याला नीरनिरळ्य माणसांशी सामना करावा लागतो , विविध रंगांची स्वभावाची , philosophychi माणसे आपल्याला आढ़ळुन येतात... त्यातली कही आपल्या डोक्यात जातात... काही मनात घर करूँ राहतात ... काही कुठेच पोहचू शकत नाहीत ... काही आपल्याला चिड आणतात... काहीना आपण चिड आणतो... काही आपल्याला हसवतात ... काही आपल्याला हसतात ...

त्यातली काही माणसे मला येड्च्याप category मधली वाटतात ...

१) कोणी माणुस मेल्यावर जेंव्हा आपण त्यांना आपण सांगतो की "अमुक तमुक माणुस गेला " तेंव्हा ही माणसे किन्चित्शी हसतात आणि मग पुढचे प्रश्न विचारायला लागतात... म्हणजे हसून ते विचारतात "काय...बोलतो ? (किंचित तोंडावर हशा )... कधी? कसा रे? वैगरे वैगरे ..."

२) बस मधे बसल्यावर काही माणसे मी पहिलियेत ...जी खिडकीची काच कधीच वर खाली करत नाहीत... म्हणजे जी चढतात टी लगेच येउन सीट वर घाबरून गेल्याप्रमाने बसतात ... खुप गरम होत असेल अणि काच बंद असेल तर टी तशीच खाली ठेउन देतात... आणि घमने हैरान होतात... थंडी मधे याच्या उलट करतात...

३) बस मधे समजा खुप गर्दी असेल पुढून एखादा आजा किंवा आजी चढल्या ... अणि टिकिट देणारा (च्यायला conductor लिहिता येत नाही इथे ... ब्लॉगर वल्यांच्या आय्चा घो... ) मागे असेल तर साधारण चतुर लोक पैसे मागे पाठवतात ... अणि टिकिट पुढे मागवतात । साधा हिशोब असतो ... पैसे आपल्या पुढच्या माणसाला द्यायचे ... टीला सांगायचे तू तुझ्या पुढच्या ला दे... असे करत करत ते पैसे conductor कड़े पोहचतात... तसाच उल्टा प्रवास करून टिकिट मागे येतात... पण काही येड्च्याप लोकाना हे कळतच नाही ... ते पैसे हातात आले की मक्ख चेहर्याने बघत बसतात .... पैसे द्यायच्या अगोदर त्याना हाक मरावी तर घाबरून लक्ष नस्ल्यासरखे दाखवतात ... मग सांगतात conductor बहोत लाम्ब है !! तेंव्हा मला वाटते त्याला सांगावा अरे येड झ@#@@नि च्या "conductor बहोत लाम्ब है" इसी लिए हम ने ये खेळ मांडा हैं ना ? पैसा पास पास करनेका ... बात करता है तोंड वर करके ...
असो...
४) आपलाच म्हणण पुढे रेट्नारी माणसे ... मला तर त्यांचा हेवा वाटतो ... कुठून आणतात ते इतका आत्मविश्वास? असाच एक टैक्सी ड्राईवर मला भेटला ... सगल्या चुकीच्या गोष्टी तो आत्मविश्वासाने सांगत होता... एवढ्यात २४ तास फालतू मचमच करणरे (FM) रेडियो असतात ना ? त्यातून जन हितार्थ एक जाहिरात कर्करली
हेलमेट न वापरण्याची किती विविध कारणे मनसे देतात ... पण अखेर त्यांचाच कसा लॉस आहे वैगरे...
ती ad संपली आणि या माणसाने त्या ad मधली जी खोटी कारणे होती तीच कशी बरोबार आहेत हे सांगायला सुरुवर केलि ... पण तो ज्या स्टाइल ने सांगत होता ते ऐकून मला वाटले की खरच ती जाहिरात हेलमेट वापरायला सांगत होती की वापर टाळाय्ला सांगत होती.. (हा प्रसंग जसा झालाय तसा नाही लिहिता आलाय... परत लिहायला लागणार बहुतेक ... aso)

अजुन काही येड्च्याप माणसे थोडक्यात

५) cunductor ने टिकिट दिल्यावर चक्क त्याला थैंक्यू म्हणणारि माणसे...
६) रोजच्या प्रवासात दिसेल त्या छोट्या मोठ्या देवळाला छोटे छोटे नमस्कार करणारी माणसे

सध्यातरी एवढीच आठवतायत बाकीची पुढच्या पोस्ट मधे ...