गुरुवार, १६ एप्रिल, २००९

कसाब बाळा ... उगी उगी

कसाब्च्या एक एक बातम्या ऐक्ल्यात ना? येड्या सारखा हसतो काय? आपल्या न्याय व्यवस्थे ला हसतो की काय तो? तो मनात म्हणत असेल काय येड झवे लोक आहेत भारतातले ... मी यांच्या छाताडा वर थया थया नाचत गोळिबार केला , निरपराध लोकाना झुरळ मारावित तसे मारले... यांच्या डोळ्यासमोर रक्त मासाचा चिखल करून दाखवला... आणि ही माणसे अजुन पुरावे गोळा करतायत... एखाद्या वेड्या माणसाने न दिसणारा कचरा गोळा
करावा तसा ... पेपर काय वाचायला मागतो... मग न्यायमूर्ति त्याला आश्वासन पण देतात .... कसाब माझ्या बाळा ... उगी उगी ... कायद्यात बसत असेल तर देऊ हा आम्ही तुला पेपर... उद्या तो कायद्यात काय काय बसवेल आणि कोणाच्या तरी घरात जाउन झोपेल ... मी तर म्हणतो त्याच्या आई वडिलांना विचारून त्याच्या साठी एखादी मुलगी बघा म्हणावे... लग्न उरकून टाकू... VT स्टेशन वर मंडप उभारू ... मुलगा लग्ना नंतर तरी सुधारतो का बघू... जबाबदारी येइल मग कुठला वेळ मिळेल त्याला लोक मारायला ...

त्याचा काय भरवसा नाही निवडणुक लढवायला मागायचा तो ... मग कायदा पण म्हणेल कसाब माझ्या बाळा ... उगी उगी ... कायद्यात बसत असेल तर देऊ हो आम्ही तुला लढवायला ...

काय चाललय हे ? हे असले कायदे बदलायला नकोत...? काही हुशार टाळकी बसवून अशा परिस्थित योग्य आणि तत्पर न्याय निवडा होण्यासाठी काहीतरी करा ना? हे असले कायदे बदलायला कसले प्रोब्लेम्स असतात हो?
आणि म्हणे महासत्ता ? डोम्ब्लाची महासत्ता ?

५ टिप्पण्या:

अनामित म्हणाले...

ਚੋੰਮੇਨ੍ਤ ਕੁਥਲ੍ਯਹਿ ਭਸ਼ੇਤ ਦਿਲਿ ਤਰਿ ਓਕੇ?
ਮਗ ਹੀ ਘੇ ਪਮ੍ਜਾਬਿ ਮਧੁਨ ਮਰਥਿ ਕੋਮੇਨ੍ਤ! :)
ਜਯ ਬਜਿਰਵ!

ओंकार देशमुख म्हणाले...

त्याला कधीच फ़ाशी द्यायला हवी होती..पण मग आपले राजकारणी त्याचा फायदा कसा घेणार? त्याच्या नावावर सभात्याग कसा करणार? मोर्चे रॅलीज कशा निघणार? त्याच्या नावावर भाषणं कशी ठोकणार??? एका माणसाच्या न मरण्यान त्यांना इतका फायदा होणार असेल तर बाकीची काळजी कशाला करायची आणि कशाला त्याच्या फाशीची मागणी करायची?
सत्ताधारी पण खूश आणि विरोधक पण खूश...
http://www.pune-marathi-blog.blogspot.com/

Jay म्हणाले...

tuza "yedzave" shabda laai avadala.. !!

Mazya langoti yaaranbarobar boltana ha shabda (ani hi shabdawali) amhi nehemi pracharat aNato.. :D

Holidays Maharashtra (HMDC) म्हणाले...

Tya Haramkhorala Chowkat anun Chabkane chople pahije . . .

Unknown म्हणाले...

कसाब लिखित नवीन पुस्तक
डास बोध
प्रस्तावना
अफजल गुरु