गुरुवार, २३ एप्रिल, २००९

"मी शिवाजी राजे भोसले बोलतोय "

पहायचा, पहायचा अस बरेच दिवस मानत होत... शेवटी पहिला...

पहिल्या दिवशी गेलो तर सिनेमा हौसफुल होता .... जरा वाईट वाटल... पण एक माला आवड्ल ते म्हणजे multiplex मधे शनिवारी पण मराठी सिनेमा जोरात चालतोय ते ... म्हंटला बघुया नंतर... काही बिघडत नाही ...

सिनेमा म्हणजे आपला जिव की प्राण ... त्यात थोरल्या महाराजांच्या नावावर काढलेला सिनेमा म्हणजे पहायलाच हवा होता ... सिनेमा आवडला ... ज्या काय थोड्या माफक अपेक्षा होत्या त्या पूर्ण झाल्या ... मांजरेकर कडून किती अपेक्षा ठेवणार ? मराठीतला माझा अजुन पर्यंतचा आवडता सिनेमा "डोम्बिवली फास्ट "।

हल्ली मराठी सिनेमात पूर्वी पेक्षा चांगला चकचकीतपणा येतोय... तबला सितार बासरी यात अडकलेल्या मराठी संगीतात नविन आधुनिक प्रयोग होतायत ... (सामान्यांच्या भाषेत एक वाक्यात सांगायचे तर ) एकंदर मराठी सिनेमा ची quality सुधर्तेय...

मशिराभोबो मधे काही गोष्टी मला नाही आवडल्या ... सिनेमात मराठी माणसावर अन्याय झालाय ... त्याला सगळे कमी लेखता आहेत .... हे एवढे परिणाम कारक नाही दाखवलेले ... सचिन खेडेकर हा काही घाबराट वैगरे नाही वाटत ... तो तर मला पहिल्या पासून कडक्च वाटला ... (शेवटी सिनेमा हा दिग्दर्शकाचा असतो ... कदाचित त्याला तसाच दाखवायचे असेल... आपण कुठ्यला mindset ने ते बघतो त्यावर आपले interpretation अवल्म्बुन असते... ) शिवाजी राजांचा घोड़ा फारच पुचाट वाटला ... शेवटी खेडेकरांची मुलगी साईट हयाक करते ते फार हास्यास्पद आहे...असो...

आवडलेल्या गोष्टी म्हणजे... सिनेमाची कल्पना (मध्यवर्ती ... का काय म्हणतात ना ती ...) लय भन्नाट !
मराठी कलाकारांची acting (त्यात कोणाचे ही दुमत नाही... ) लय भन्नाट !
fusion केलेला अफझल खान वधाचा पोवाडा ...मस्तच ... (असे खुप यायाल हव हो मराठी मधे)
चटपाटित संवाद ... मस्त

आणि महेश मांजरेकर, महाराजांच्या वेशात कड़क दिसतात .... काही लोक बोलतात की मांजरेकर म्हातारे वैगरे दिसतात पण त्यात काय दम नाही ... च्यायला हे लोक काय बघायला गेले होते काय खरे शिवाजी महाराज अमुक अमुक वयात असे दिसत होते ते ... कोणाला माहिती आहे का ते खरेच कसे दिसत होते ते... ?

अरे आपण लोकल मधे जाऊन येउन इतके थकतो की ३० मधेच ५० चे वाटायला लागतो... आणि महाराजांसारखा
एवढा मोठा माणूस ज्याने आपली उभी हयात घोड्यावर ... सह्याद्रीच्या उन पावसात काढली ... कित्येक लढाया केल्या... ते काय गोरे गोरे .... गुट गुटित... गोड गोड दिसणार आहेत? ते रापलेले आणि राकट दिसायला हवेत... (हे सर्व माझे interpretation)...

तर सांगायची गोष्ट अशी की काही ही पुचाट कारणे न देता ... हा सिनेमा बघा... मोठ्या पडद्यावरच बघा अणि मग काय ते बोला...

1 टिप्पणी:

Kanchan Karai (Mogaraafulalaa) म्हणाले...

"आणि महेश मांजरेकर, महाराजांच्या वेशात कड़क दिसतात .... काही लोक बोलतात की मांजरेकर म्हातारे वैगरे दिसतात पण त्यात काय दम नाही ... च्यायला हे लोक काय बघायला गेले होते काय खरे शिवाजी महाराज अमुक अमुक वयात असे दिसत होते ते ... कोणाला माहिती आहे का ते खरेच कसे दिसत होते ते... ?

अरे आपण लोकल मधे जाऊन येउन इतके थकतो की ३० मधेच ५० चे वाटायला लागतो... आणि महाराजांसारखा एवढा मोठा माणूस ज्याने आपली उभी हयात घोड्यावर ... सह्याद्रीच्या उन पावसात काढली ... कित्येक लढाया केल्या... ते काय गोरे गोरे .... गुट गुटित... गोड गोड दिसणार आहेत? ते रापलेले आणि राकट दिसायला हवेत... (हे सर्व माझे interpretation)...

तर सांगायची गोष्ट अशी की काही ही पुचाट कारणे न देता ... हा सिनेमा बघा... मोठ्या पडद्यावरच बघा अणि मग काय ते बोला... "


१००% टक्के सहमत.