बुधवार, १० जून, २००९

नावडत्या झोळीत काय काय जमा झालंय?

लिहायचा कंटाळा नेहमीच येतो... आणि तो genuine असल्यामुळे मी हि त्याला टाळत नाही... ये किती येतोस तितका ये..

त्यामुळेच कि काय मी विचार करतोय ... सध्या डोक्यात जे चाललंय ते एका वाक्यातच लिहायचे .... लोकांना पण त्रास नाही...

हल्ली वैताग आणि कंटाळा फार येतात ... राग तर नेहमीचाच आहे .... कसं झालंय ... अमुक अमुक माणूस असा वागतोय .... ते मनाला पटलं तर टाक आवडत्या झोळीत नाहीतर नावडत्या झोळीत... अश्या दोन झोळ्या घेऊनच फिरतो.

बघूया नावडत्या झोळीत काय काय जमा झालंय...

१) हल्लीची हिंदी गाणी .... सिनेमे .... serials.... शी शी ... मराठी परवडतात ...

२) मराठी serials ज्यात झूम झूम असे आवाज आणि म्हातारी माणसे , तरुण माणसे सर्वाचंचे थोबडे close up मध्ये मागे पुढे करत राहतात ....

३) इंग्रजाळलेली मुलं... ह्यांनी काय घोडे मारलाय माजं काय माहित? पण नाही आवडत (यात पण २ प्रकार आहेत, जन्मापासून असलेले आणि नवीन तयार झालेले ) अर्थात नवीन तयार झालेल्यांना आणि हळू हळू इंग्रजाळत जाणार्यांना आम्ही डोळ्या समोर पण ठेवत नाही... बेक्कार लोक ... जन्मा पासून असलेले लोकांशी काही प्रोब्लेम नाही. म्हणजे जर नीट पहिला तर मला वाटत ढोंगी पणाचा मला राग येत असावा...

४) bike चालवणारे .... हि जमात सगळीकडे फोफाव्लेय .... यांना फटकावून काढायला पाहिजे .... रस्त्यावर मोठा आवाज करत .... लोकांची परवा न करत overtake करायचे .... अति वेगात गाडी चालवायची .... बस stop वर उभ्या असलेल्या माणसां मधून गाडी पुढे न्यायची .... कोणी हटकले तर ठसन द्यायची .... म्हणजे कसलाच धरबंध बाळगायचा नाही... हे असे एवढे वेगात कुठे जातात हे लोक आणि का? आई आजारी असते का यांची ? औषधे आणायला जात असतात का हे भिकारचोट लोक ... bike नियम न पाळता चालवणे हि एक प्रवृत्ती आहे.... तो माणूस आपल्या सामान्य जीवनात पण असेच वागत असणार .... संधीसाधू साले .... या माणसांपासून सावध राहायला हवे... किंवा जेंव्हा जेंव्हा संधी मिले तेंवा यानां फटकावला पाहिजे ... (१,२ प्रसंग झालेत तसे .... मज्जा येते...) तुम्ही इथे माज्या मनस्थिती ची तुलना "डोंबिवली फास्ट" मधल्या "माधव आपटे" शी केलीत तर कळेल मी का चिडतो ते? माधव आपटे तसा सर्वां मध्ये असतो .... थोडा थोडा ... जास्त नसतो ... जास्त झाला कि गोळी खावी लागते...

५) bike वाल्यांसार्खेच बस मध्ये चढून मागे मागे राहणारी माणसे .... यांचे शिक्षण कधी होणार ? म्हणूनच हे वर्शोनावर्ष बस मध्येच प्रवास करत राहतात आणि मरून जातात म्हातारे होऊन .... बुद्धी ची वाढ अशी नाहीच ...

६) हल्ली अंगात एक नवीन sense तयार झालाय... माणूस ओळखण्याचा ... कोणीही chat वर ..फोन वर एक अक्षर जरी बोलला तरी मला कळते (असा मला वाटतंय.. खरं कि खोट माहित नाही...) कि हा खरंच मनापासून बोलतोय... खोट बोलतोय ... ओढून ताणून बोलतोय ? कि अजून काय? सर्व स्पष्ट कळत... (येडा झालोय कि काय मी च्यायला ? :)) ...असो !!!

७) हल्ली इतरांशी मराठीत बोलणे सुरु केलंय... कोणी हि असो... vodafone ग्यालरीत बसणारी पोरगी असो ... भय्या रिक्षावाला असो ... कोणीही माय चा लाल असो ... पहिल काम मराठीत बोलण... मराठी ला कमी समजणारी .... शिवाजी महाराजांविषयी काही बोललो कि शी... म्हणारी माणसे माज्या या नावडत्या झोळीत पार तळाशी चेपून ठेवलीत मी...

८) दर वीकेंडला (कसला डोंबलाचा विकेंड ... येडझवे गिरी सगळी ) न चुकता हॉटेलिंग आणि गरज नसता ... छंद म्हणून ... कंटाळा आलाय.म्हणून... शॉपिंग करणारी माणसे .... ( अशी मस्तकात तिडीक जाते ना... माज्या एका मित्राने तर यांना कीड न्याप करून यांची पैशाची मस्ती जिरवायची कल्पना सांगितली होती... भन्नाट आहे कल्पना... ) आणि अजून एक जमात आहे यांच्यात ... खूप दिवस काहीच खरेदी केली नाही म्हणून शॉपिंग करणारे पांचट लोक... लट्ठ पगार मिळतायत म्हणून हि थेरं यांची ... साले ... उद्या कंपनी ने नको तिथे लाथ मारल्यावर ....बर्रोबर वठणीवर येतील सगळे... पिज्जे ... पास्ते .... म्याक फूड ... बटर चिकन... गार्लिक नान रोटी .... रुमाली रोटी ... आणि काय काय खातात ... अंगात चरबी सगळीकडून लोंबत असली तरी ....

सध्यातरी नावडत्या झोळीतुन एवढाच काढलाय बाहेर... पुढचं नंतर ...