बुधवार, १० जून, २००९

नावडत्या झोळीत काय काय जमा झालंय?

लिहायचा कंटाळा नेहमीच येतो... आणि तो genuine असल्यामुळे मी हि त्याला टाळत नाही... ये किती येतोस तितका ये..

त्यामुळेच कि काय मी विचार करतोय ... सध्या डोक्यात जे चाललंय ते एका वाक्यातच लिहायचे .... लोकांना पण त्रास नाही...

हल्ली वैताग आणि कंटाळा फार येतात ... राग तर नेहमीचाच आहे .... कसं झालंय ... अमुक अमुक माणूस असा वागतोय .... ते मनाला पटलं तर टाक आवडत्या झोळीत नाहीतर नावडत्या झोळीत... अश्या दोन झोळ्या घेऊनच फिरतो.

बघूया नावडत्या झोळीत काय काय जमा झालंय...

१) हल्लीची हिंदी गाणी .... सिनेमे .... serials.... शी शी ... मराठी परवडतात ...

२) मराठी serials ज्यात झूम झूम असे आवाज आणि म्हातारी माणसे , तरुण माणसे सर्वाचंचे थोबडे close up मध्ये मागे पुढे करत राहतात ....

३) इंग्रजाळलेली मुलं... ह्यांनी काय घोडे मारलाय माजं काय माहित? पण नाही आवडत (यात पण २ प्रकार आहेत, जन्मापासून असलेले आणि नवीन तयार झालेले ) अर्थात नवीन तयार झालेल्यांना आणि हळू हळू इंग्रजाळत जाणार्यांना आम्ही डोळ्या समोर पण ठेवत नाही... बेक्कार लोक ... जन्मा पासून असलेले लोकांशी काही प्रोब्लेम नाही. म्हणजे जर नीट पहिला तर मला वाटत ढोंगी पणाचा मला राग येत असावा...

४) bike चालवणारे .... हि जमात सगळीकडे फोफाव्लेय .... यांना फटकावून काढायला पाहिजे .... रस्त्यावर मोठा आवाज करत .... लोकांची परवा न करत overtake करायचे .... अति वेगात गाडी चालवायची .... बस stop वर उभ्या असलेल्या माणसां मधून गाडी पुढे न्यायची .... कोणी हटकले तर ठसन द्यायची .... म्हणजे कसलाच धरबंध बाळगायचा नाही... हे असे एवढे वेगात कुठे जातात हे लोक आणि का? आई आजारी असते का यांची ? औषधे आणायला जात असतात का हे भिकारचोट लोक ... bike नियम न पाळता चालवणे हि एक प्रवृत्ती आहे.... तो माणूस आपल्या सामान्य जीवनात पण असेच वागत असणार .... संधीसाधू साले .... या माणसांपासून सावध राहायला हवे... किंवा जेंव्हा जेंव्हा संधी मिले तेंवा यानां फटकावला पाहिजे ... (१,२ प्रसंग झालेत तसे .... मज्जा येते...) तुम्ही इथे माज्या मनस्थिती ची तुलना "डोंबिवली फास्ट" मधल्या "माधव आपटे" शी केलीत तर कळेल मी का चिडतो ते? माधव आपटे तसा सर्वां मध्ये असतो .... थोडा थोडा ... जास्त नसतो ... जास्त झाला कि गोळी खावी लागते...

५) bike वाल्यांसार्खेच बस मध्ये चढून मागे मागे राहणारी माणसे .... यांचे शिक्षण कधी होणार ? म्हणूनच हे वर्शोनावर्ष बस मध्येच प्रवास करत राहतात आणि मरून जातात म्हातारे होऊन .... बुद्धी ची वाढ अशी नाहीच ...

६) हल्ली अंगात एक नवीन sense तयार झालाय... माणूस ओळखण्याचा ... कोणीही chat वर ..फोन वर एक अक्षर जरी बोलला तरी मला कळते (असा मला वाटतंय.. खरं कि खोट माहित नाही...) कि हा खरंच मनापासून बोलतोय... खोट बोलतोय ... ओढून ताणून बोलतोय ? कि अजून काय? सर्व स्पष्ट कळत... (येडा झालोय कि काय मी च्यायला ? :)) ...असो !!!

७) हल्ली इतरांशी मराठीत बोलणे सुरु केलंय... कोणी हि असो... vodafone ग्यालरीत बसणारी पोरगी असो ... भय्या रिक्षावाला असो ... कोणीही माय चा लाल असो ... पहिल काम मराठीत बोलण... मराठी ला कमी समजणारी .... शिवाजी महाराजांविषयी काही बोललो कि शी... म्हणारी माणसे माज्या या नावडत्या झोळीत पार तळाशी चेपून ठेवलीत मी...

८) दर वीकेंडला (कसला डोंबलाचा विकेंड ... येडझवे गिरी सगळी ) न चुकता हॉटेलिंग आणि गरज नसता ... छंद म्हणून ... कंटाळा आलाय.म्हणून... शॉपिंग करणारी माणसे .... ( अशी मस्तकात तिडीक जाते ना... माज्या एका मित्राने तर यांना कीड न्याप करून यांची पैशाची मस्ती जिरवायची कल्पना सांगितली होती... भन्नाट आहे कल्पना... ) आणि अजून एक जमात आहे यांच्यात ... खूप दिवस काहीच खरेदी केली नाही म्हणून शॉपिंग करणारे पांचट लोक... लट्ठ पगार मिळतायत म्हणून हि थेरं यांची ... साले ... उद्या कंपनी ने नको तिथे लाथ मारल्यावर ....बर्रोबर वठणीवर येतील सगळे... पिज्जे ... पास्ते .... म्याक फूड ... बटर चिकन... गार्लिक नान रोटी .... रुमाली रोटी ... आणि काय काय खातात ... अंगात चरबी सगळीकडून लोंबत असली तरी ....

सध्यातरी नावडत्या झोळीतुन एवढाच काढलाय बाहेर... पुढचं नंतर ...

११ टिप्पण्या:

सचिन उथळे-पाटील म्हणाले...

जय महाराष्ट्र ....!

भानस म्हणाले...

फूल टू सहमत. नंबर एक, ते हरामखोर bike वाले. माझे बाबा नेहमी म्हणतात, एक Charryachi (तो शब्द मराठीत जमतच नव्हता इथे)बंदूक आणून ह्यांचे टायरच फोडून टाकले पाहीजेत. रात्रीचे दोन वाजताही साले.....

अरे, मराठी माणसांना आजकाल इंग्रजी ही एकमेव बोली भाषा वाटते. जाऊ दे.
वाचून बरं वाटलं, जणू माझ्याच मनातली भडास काढलीस तू.

गणेश म्हणाले...

बाजीराव लय भारी बघ .......
मायला हे सर्वे कृतीतून झाले तर सर्वेजन सुता सारखे सरल होतील....तो पर्यंत आपण आपल्या परीने लधा चालूच ठेवायचा....
तुझे विचार तुझ्या लिखनातुन जाणवतात ........मजा आली वाचताना....

Prashant म्हणाले...

Ramram Bajirao,

Chaan watalaa tuzaa blog wachun...ekdum mast...
Asaach lihit jaa!
Thambu nakos!

Jai Hind, Jai Maharashtra!

Prashant.

Jay म्हणाले...

laaaaiii bhari lihilay.. !! pan engrajaLlelanbaddal mhanshil tar mixed feelings aahet mala..

jar continuously kahi varsha (more than 5 years ) US madhe rahilas ani gharachyanshi bolana kami zala (once in a week sometimes in a month ) tar americanization hotach.. (maza zala hota.. ) pan i think parat maNus jya matitun aala tya matiche guN ghetoch.. (ata parat marathi zalo aahe mi .. :D )

अनामित म्हणाले...

Hi, you can find a brief description of 'the fountainhead' on wikipedia.

-Atul

Major Amol म्हणाले...

Hi Bajirao,

Jai Maharashtra...
tujhi navadti jholi barich mothi disli.. mansachya manasarkhe kahi nasle ki te mansala awadat nahi.
tumchya samor fakt bolnya peksha don paryav astat ek tar jag badla kiva swatala badla..
mala tujhya muddyan madhla bike cha ("DUCHAKI" aamchya bhashet)nahi aawdla.
tech chukiche chalavtat ase nahi.
mi jevha car chalavto tevha mala bike wale wedewakde chalavtat ase watte, mi jevha paidal chalto tevha mala saglech aniymit chalavtat ase watte, mi jevha bike chalavto tevha mala auto an car wale rasta adavtat ase watte.
saral sangaiche tar saglech beshishtpane chalavtat, paidal lok dekil padchari marg sodun chaltat.
tya mule dosh saglyanna de... fakt bike walyana nahi.
mi bike war maharashtrachya kanakppryat firloy.
Maharajanchya durganna bheti dilyat tya majhya bike warch..
tujha evdha titkara mala nahi patla mitra...

Tujhya sarkhach Marathi bhashewar prem karnara..

Harshal म्हणाले...

tumcha mudda pan vichar karyasarkha ahe. Tumhi durg bhramanti kelit te kharach kautukaspad ahe.

Mala saglyach bike valyanvishayi nahi bolayche pan mi roj experience karto... mich nahi busstop varche sagle... auto vale pan tras detat...kadhi murkh padchari pan yedyasarkhe cross kartat... tumhi mumbai che asal tar kadhitari ghurrrrrrrrrrrrr awaj karun sattdishi rastyatun janare bike wale baghitle astil...evdya gardit jithe sagle shistit jat ahet tithe he kon rough driving karnare? beshist bike chalvanaryanvishayi mala chid ahe.Mumbai madhe malad pushpapark (towards borivali) chya stop var tumhala jivant udaharne miltil...

thanx for taking time to read my blog. :)

Major Amol म्हणाले...

aapan bhinn shaharatle aahot ha farak padla. mumbai madhe mi jevdhe baghitle tar mumbaitil wahtukila barich shisht aahe.
aamchya punyat shalet janare chote por pan wrong side nech jate.
ithe niyam palne ha gunha aahe, tyat saglech modtat... bike pasun pune corporation chya PMT pan.
tyamule punyat dosh aamchya saglyancha aahe....
mumbai baddal mi tipni nahi devu shaknar.....
Dhanyawad...
an asech lihat raha, marathichi thorvi wwadhwa...

Vishal Kalel म्हणाले...

"कसला डोंबलाचा विकेंड ... येडझवे गिरी सगळी"
वाह वाह . क्या बात है (हिंदी चालेल ना)!
याला म्हणतात साहित्याचा नवीन प्रकार. खरेच डोक्यातला राग उकळून उकळून आटल्यावर असा भन्नाट प्रकार तयार होतो !! अहो बाजीराव लिहा हो काहीतरी अजून ...

veerendra म्हणाले...

वा ... अगदी मुद्द्याच बोल्लात् श्रीमंत .. तुमची अनुदिनी आज प्रथमच चाळली .. मनापासून आवडली ..
आणि आता या लेखातले मुद्देतर् चपखल लिहीले आहेत् ..