बुधवार, २९ जुलै, २००९

१० दिवसांचा बाप

२१ july ला दुपारी १:४२ वाजता माझी मुलगी जन्माला आली ...पोरगी खरतर रात्रि ४ पासून यायला बघत होती ... पण आई ला कळा पुरेश्या येत नव्हत्या ... मी भल्या सकाळी मीरा रोड वरुन पनवेल ला पोहचलो... पनवेल्च्या डॉक्टर गुणे म्यादमची खासियत अशी की सीज़र जितका टाळाय्चे तितक्या त्या टाळतात (मी पाहिलेल्या एकदम हुशार आणि शिस्तप्रिय डॉक्टर ) ... पण कळा देताना पुरेश्या ना देता आल्यामुले ... बाळाचे डोके मागुन सुजले...मग सीजर शिवाय पर्याय नाही... असे डॉक्टर म्हणल्या
पटकन निर्णय घेतला... आणि २०/२५ मिनिटात आमची चींटी या जगात आली ... इवले इवले हात पाय ... छोटुसा नाक ... गुलाबी गुलाबी ओठ ... कमाल म्हणजे झाल्या झाल्या नर्स जेंव्हा दाखवायला आली ... "ही पहा तुमची पोरगी... " तेंवा ते इटुकल बाळ माज्याकडे पाहून चक्क हसलं ... बापाला पहिल्या भेटीतच smile दिलं पोरीने ... हे सर्व बघता बघता का कुणास ठाउक सगळ धूसर दिसायला लागलं ... डोळ्यात पाणी कधी जमा झालं कळालच नाही... आमच्या घरात कोणालाच पडत नाहीत अश्या खळया गालावर घेउन पोरगी हसत होती.

सदा चिडखोर बापाला रडवुन हसवाणारि एक छोटीशी पोरगी माज्या आयुष्यात आली ... मी "बाप" झालो... बाजिरावाला बेटी झाली.

सध्या माझे वय १० दिवसांचा बाप असे आहे ;)

मंगळवार, १४ जुलै, २००९

अजिबात आवडला नाही..

परवा "transformers- revenge of the fallen" पहिला...अजिबात आवडला नाही..
संपूर्ण चित्रपट भर महामूर्ख यंत्रांचा धुमाकूळ चालू होता... नुसता गोंधळ ... त्यात कथा एकदम भंगार...

मला याचा पहिला भाग खूप आवडला होता... मस्त होता...

यात मात्र मायकल बे ने अति शहाणपणा करत काही हि दाखवलाय...त्याला मेल केलाय माजे पैसे मला परत हवे म्हणून ...
चायाला आम्हाला कोणी असे करोडो रुपये दिले आणि special effects वाल्यांची टीम दिली तर आमच्या डोक्यात असलेले सर्व आम्ही नक्कीच या चित्रपटापेक्षा चांगले बनवून दाखवू...मस्करी/ अतिशयोक्ती नाही...

मूळ सिनेमाची जी कल्पना आहे ती भन्नाट आहे...प्रश्नच नाही... पण पडद्यावर जे काही दाखवलाय... ते मला चीड आणणारे होते ...संवाद तर डोक्यात जात होते... एक एक वाक्याचे संवाद .... ते पण मरणाच्या घाईत ....

आणि अमेरिकन आर्मी स्वतःला कोण समजते .... जगात आम्ही कुठेही काही हि झाले तरी डोकं थंड ठेऊन लढाया करू शकतो... तेच तेच air force चे लाँग शोट्स... मागे एक विमान ...पुढे १०/१२ सैनिक आपल्या दिशेने हेल्मेट हातात पकडून चालत येतायत ...किती वेळ तेच तेच .... किती हि मोठा संकट आले तरी हि कॉम्पुटर का कसल्यातरी स्क्रीन समोर बसलेली माणसे घाई घाई किंवा प्रचंड थंड पणे...एकमेकांना आदेश देत सुटतात ... मागे बोंब स्फोट होत असले तरी उडणारी / धावणारी जी माणसे असतात ती काहीतरी पुचाट विनोद करत असतात...किती वेळ तेच तेच... प्रचंड उलथापालथ झाली तरी हिरो आणि हेरोईन आणि जी कोण टाळकी असतात त्यांना काही हि होत नाही... मग आमचे मिथुन, सुनील शेट्टी, या मंडळींचे सिनेमे बरे... ते निदान आव तरी नाही आणत... काही great बनवल्याचा.. . तुमच्या हातात खूप पैसा आणि technology आहे म्हणून डोकं न वापरता काहीही दाखवाल... ?