मंगळवार, १४ जुलै, २००९

अजिबात आवडला नाही..

परवा "transformers- revenge of the fallen" पहिला...अजिबात आवडला नाही..
संपूर्ण चित्रपट भर महामूर्ख यंत्रांचा धुमाकूळ चालू होता... नुसता गोंधळ ... त्यात कथा एकदम भंगार...

मला याचा पहिला भाग खूप आवडला होता... मस्त होता...

यात मात्र मायकल बे ने अति शहाणपणा करत काही हि दाखवलाय...त्याला मेल केलाय माजे पैसे मला परत हवे म्हणून ...
चायाला आम्हाला कोणी असे करोडो रुपये दिले आणि special effects वाल्यांची टीम दिली तर आमच्या डोक्यात असलेले सर्व आम्ही नक्कीच या चित्रपटापेक्षा चांगले बनवून दाखवू...मस्करी/ अतिशयोक्ती नाही...

मूळ सिनेमाची जी कल्पना आहे ती भन्नाट आहे...प्रश्नच नाही... पण पडद्यावर जे काही दाखवलाय... ते मला चीड आणणारे होते ...संवाद तर डोक्यात जात होते... एक एक वाक्याचे संवाद .... ते पण मरणाच्या घाईत ....

आणि अमेरिकन आर्मी स्वतःला कोण समजते .... जगात आम्ही कुठेही काही हि झाले तरी डोकं थंड ठेऊन लढाया करू शकतो... तेच तेच air force चे लाँग शोट्स... मागे एक विमान ...पुढे १०/१२ सैनिक आपल्या दिशेने हेल्मेट हातात पकडून चालत येतायत ...किती वेळ तेच तेच .... किती हि मोठा संकट आले तरी हि कॉम्पुटर का कसल्यातरी स्क्रीन समोर बसलेली माणसे घाई घाई किंवा प्रचंड थंड पणे...एकमेकांना आदेश देत सुटतात ... मागे बोंब स्फोट होत असले तरी उडणारी / धावणारी जी माणसे असतात ती काहीतरी पुचाट विनोद करत असतात...किती वेळ तेच तेच... प्रचंड उलथापालथ झाली तरी हिरो आणि हेरोईन आणि जी कोण टाळकी असतात त्यांना काही हि होत नाही... मग आमचे मिथुन, सुनील शेट्टी, या मंडळींचे सिनेमे बरे... ते निदान आव तरी नाही आणत... काही great बनवल्याचा.. . तुमच्या हातात खूप पैसा आणि technology आहे म्हणून डोकं न वापरता काहीही दाखवाल... ?

७ टिप्पण्या:

भानस म्हणाले...

१००% सहमत. काहीही दाखवतात आणि प्रेक्षकांच्या माथी मारतात. :(

Somesh Bartakke म्हणाले...

समिक्षण वाचले, वेळ घालवणार नाही ..

Harshal म्हणाले...

पोच पावती दिल्या बद्दल भानस अणि Somesh Bartakke यांचे आभार ... आपण लिहिलेले कोनीतरी वाचतय हे कळले तरी खुप आनंद होतो.

Vishal Kalel म्हणाले...

नमस्कार हर्षल.. उर्फ बाजीराव!!
तुझा ब्लॉग पाहिला.. वाचला.. खूष झालो.. खूप हसलो.. भन्नाट एकदम!!
रेहमान बाबा च्या प्रेमामुळे तुझ्या ब्लॉग पर्यंत पोचलो.
बऱ्याच गोष्टी ज्या माझ्या डोक्यात रेंगाळत होत्या त्या तू लिहिलेल्या आहेत. म्हणजे आपली फ्रिक्वेन्सी एकदम जुळते!
एकदम natural भावना..
असेच लिहित जा खूप खूप..

बाजीरावच्या प्रेमात पडलेला एक ब्लॉग-वाचक!
विशाल

Harshal म्हणाले...

thnx vishal... rahman ne mala khup dile... mi ani maje kahi mitr posloy tyachya sangitavar..

by the way tu arr fans group cha member ahes ka? naslyas ho....

do u listen tamil also?

Vishal Kalel म्हणाले...

अरेय मित्र तुझा इमेल पत्ता दे मला . पूर्ण स्टोरी इथे नाही सांगू शकत. माझा मेल पत्ता आहे vishal.kalel@gmail.com

Somesh Bartakke म्हणाले...

बाजीराव,
लिहीता येत तर हात राखू नका राव .. लिहित जा मधून अधून .. आठवड्यातून चार ओळी तरी ..