बुधवार, २९ जुलै, २००९

१० दिवसांचा बाप

२१ july ला दुपारी १:४२ वाजता माझी मुलगी जन्माला आली ...पोरगी खरतर रात्रि ४ पासून यायला बघत होती ... पण आई ला कळा पुरेश्या येत नव्हत्या ... मी भल्या सकाळी मीरा रोड वरुन पनवेल ला पोहचलो... पनवेल्च्या डॉक्टर गुणे म्यादमची खासियत अशी की सीज़र जितका टाळाय्चे तितक्या त्या टाळतात (मी पाहिलेल्या एकदम हुशार आणि शिस्तप्रिय डॉक्टर ) ... पण कळा देताना पुरेश्या ना देता आल्यामुले ... बाळाचे डोके मागुन सुजले...मग सीजर शिवाय पर्याय नाही... असे डॉक्टर म्हणल्या
पटकन निर्णय घेतला... आणि २०/२५ मिनिटात आमची चींटी या जगात आली ... इवले इवले हात पाय ... छोटुसा नाक ... गुलाबी गुलाबी ओठ ... कमाल म्हणजे झाल्या झाल्या नर्स जेंव्हा दाखवायला आली ... "ही पहा तुमची पोरगी... " तेंवा ते इटुकल बाळ माज्याकडे पाहून चक्क हसलं ... बापाला पहिल्या भेटीतच smile दिलं पोरीने ... हे सर्व बघता बघता का कुणास ठाउक सगळ धूसर दिसायला लागलं ... डोळ्यात पाणी कधी जमा झालं कळालच नाही... आमच्या घरात कोणालाच पडत नाहीत अश्या खळया गालावर घेउन पोरगी हसत होती.

सदा चिडखोर बापाला रडवुन हसवाणारि एक छोटीशी पोरगी माज्या आयुष्यात आली ... मी "बाप" झालो... बाजिरावाला बेटी झाली.

सध्या माझे वय १० दिवसांचा बाप असे आहे ;)

१२ टिप्पण्या:

mugdha म्हणाले...

shevatachi ol khup aavadali..:)
shubhechcha!!

Pravin म्हणाले...

अभिनंदन मित्रा. तसेच तुझे उरलेले पोस्ट्स सुद्दा वाचले.. आवडले. :)

Yawning Dog म्हणाले...

Abhinandan mitra !

भानस म्हणाले...

अभिनंदन हर्षल. बाजीरावाच्या बेटीचे नाव काय ठेवणार आहेस?

Harshal म्हणाले...

saglyani abhinandan kelyane khup bara vatla...thnx mhananar nahi khup formal vatel. :)

bhanas: nav nahi thevlay ajun... sangen thevlyavar :)

LaVish म्हणाले...

हर्षल तुझ्या शब्दांमध्ये वेगळीच जादू आहे. when i finished reading the post, I was smiling with tears in my eyes..(आनंदाश्रू, शब्दच नव्हता आठवत!). I feel life more beautiful when i read your thoughts. आणि मला माहित आहे कि असा मी एकटाच नाहीये. happy fatherhood and keep posting!!

Ajay Sonawane म्हणाले...

sahi re, congrates mulgi jhalybaddal ! "mi bajirao" hi image khup mast ahe, avdali ekdam

Ajay Sonawane म्हणाले...
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
Photographer Pappu!!! म्हणाले...

mitra if you dont mind then can you invite me to your other blog please my id is pravin.patade@gmail.com? If it is too personal then no problem :) BTW majhya khedyatil ghar kaularuvar pratikriya dilyabaddal dhanyawaad.

Vishubhau म्हणाले...

आमच्या हार्दिक शुभेच्छा !!!

आपला,
(आनंदि)विशुभाऊ,

राज जैन म्हणाले...

abhinadan re...

aaj vaachala sagala blog tuzaa
mast lihatos
aavadale.....

:)

Jay म्हणाले...

sahich ..!! Ata alomst 8 te 9 mahinyanchi zali asel..