गुरुवार, १३ ऑगस्ट, २००९


दर १५ ऑगस्ट ला काही ना काही संकट आहेच ... कधी अतिरेक्यांचे बोम्ब्स्फोट... कधी पुर ... तर कधी काय तर कधी काय... या वेळी स्वाइन फ्लू चे संकट ... आशा करतो या स्वतंत्र दिनी या रोगापासून सगळे स्वतंत्र होवोत ...

मंगळवार, ११ ऑगस्ट, २००९

करू शकतो का हो असा काही कायदा?

च्यायला या स्वाइन फ्लू ने तर वाट लावलीय ... टीवी वाले दुष्काळी काम मिळाल्या सारखे मन लावून लोकाना घाबरवतायत, मी पण कधी panic होतो, कधी समजदार होतो...कधी थोडा निश्कळजिपणा करतोय. असो

कसाब चे लाड चालूच आहेत... आत्ता काय तर राख्या बांधायला हव्यात त्याला... एकाच मुस्कटत दया ना त्याला कशाला बोलू देता त्याला काहीही ... श्य्या... कायद्याचाच फायदा घेतोय साला ... सगळे षंढ बनलेत त्याच्यासमोर, तो पण मनातल्या मनात हसतअसेल
(उघड पण हसत असेल...आणि हस्तोच तो ) बोलत असेल कसं येडा बनाव्तोय या भारत सरकारला ... पोलिसाना ....जनतेला .... त्यांचाच कायदा ...त्यांच्याच गळ्यात... नाहीतरी मला मराय्चेच आहे ... जरा यांची मजा करून मरू .... अजुन माझ्यासारखे येतीलच यांची मजा घ्यायला ... काय मस्त देश आहे...

मी म्हणतो कसाब ला खरी शिक्षा द्यायची असेल ना तर त्याच्या मनात जे चाललय ना त्याच्या उलट किंवा काहीतरी बेक्कार करा त्याच्याबद्दल ... त्याला वाटत असेल हे लोक चिडून आपल्याला मारतील, फाशी देतील...
त्याला फाशी द्यायचीच नाही....नो नो .... प्रश्नच नाही... त्याला जिन्वत ठेवायचा ..... थोडा थोडा त्रास देऊन .... म्हणजे त्याच्या हाताचा अंगठा काढून टाकायचा ... (जरा imagine करा तुम्हालाएकही अंगठा नसेल तर कशी गत होते ते पहा )... किंवा त्याला रोज पोटात दुखेल .... रोज अमांश होइल पण जास्त त्रास ही होणार नाही असे औषध दया ... रोज मरून जिवंत राहिला पाहिजे असे करा... थोडक्यात ...

आणि एक करा दर आठवड्याला त्याच्या हातात एक बन्दूक दया आणि त्याच्या कडून इतर पकडलेल्या अतिरेक्यांना गोळ्या मारायला सांगा... सगळ्या देशातले अतिरेकी त्याच्या हातुन ठार होऊ दयात... दर आठवड्याला १० तरी मेले पहिजेतच ... बघू किती थंड पणे मारू शकतो आपल्या भाऊबंधाना ... खरा अतिरेकी आहे ना तो ... मारू दे ना त्याला ... बिचार्या निरपराध लोकाना , लहान मुलाना मारताना जो विकृत चेहरा ठेवून हसत होता तसा होतो का पाहुया त्याचा लोकाना मारताना ....

करू शकतो का हो असा काही कायदा?

आमचे थोरले महाराज असते तर लगेच पास केला असता हा कायदा... गुन्हेगाराना शिक्षा आणि जरब बसण्यासाठी त्यानी काय केले हे इतिहास वाचताना कळतेच... पण आता महाराज नाहीत .... त्यांच्या जबरी शिक्षा नाहीत ....फक्त गुन्हेगार मात्र उरलेत ... मोकाट !