मंगळवार, ११ ऑगस्ट, २००९

करू शकतो का हो असा काही कायदा?

च्यायला या स्वाइन फ्लू ने तर वाट लावलीय ... टीवी वाले दुष्काळी काम मिळाल्या सारखे मन लावून लोकाना घाबरवतायत, मी पण कधी panic होतो, कधी समजदार होतो...कधी थोडा निश्कळजिपणा करतोय. असो

कसाब चे लाड चालूच आहेत... आत्ता काय तर राख्या बांधायला हव्यात त्याला... एकाच मुस्कटत दया ना त्याला कशाला बोलू देता त्याला काहीही ... श्य्या... कायद्याचाच फायदा घेतोय साला ... सगळे षंढ बनलेत त्याच्यासमोर, तो पण मनातल्या मनात हसतअसेल
(उघड पण हसत असेल...आणि हस्तोच तो ) बोलत असेल कसं येडा बनाव्तोय या भारत सरकारला ... पोलिसाना ....जनतेला .... त्यांचाच कायदा ...त्यांच्याच गळ्यात... नाहीतरी मला मराय्चेच आहे ... जरा यांची मजा करून मरू .... अजुन माझ्यासारखे येतीलच यांची मजा घ्यायला ... काय मस्त देश आहे...

मी म्हणतो कसाब ला खरी शिक्षा द्यायची असेल ना तर त्याच्या मनात जे चाललय ना त्याच्या उलट किंवा काहीतरी बेक्कार करा त्याच्याबद्दल ... त्याला वाटत असेल हे लोक चिडून आपल्याला मारतील, फाशी देतील...
त्याला फाशी द्यायचीच नाही....नो नो .... प्रश्नच नाही... त्याला जिन्वत ठेवायचा ..... थोडा थोडा त्रास देऊन .... म्हणजे त्याच्या हाताचा अंगठा काढून टाकायचा ... (जरा imagine करा तुम्हालाएकही अंगठा नसेल तर कशी गत होते ते पहा )... किंवा त्याला रोज पोटात दुखेल .... रोज अमांश होइल पण जास्त त्रास ही होणार नाही असे औषध दया ... रोज मरून जिवंत राहिला पाहिजे असे करा... थोडक्यात ...

आणि एक करा दर आठवड्याला त्याच्या हातात एक बन्दूक दया आणि त्याच्या कडून इतर पकडलेल्या अतिरेक्यांना गोळ्या मारायला सांगा... सगळ्या देशातले अतिरेकी त्याच्या हातुन ठार होऊ दयात... दर आठवड्याला १० तरी मेले पहिजेतच ... बघू किती थंड पणे मारू शकतो आपल्या भाऊबंधाना ... खरा अतिरेकी आहे ना तो ... मारू दे ना त्याला ... बिचार्या निरपराध लोकाना , लहान मुलाना मारताना जो विकृत चेहरा ठेवून हसत होता तसा होतो का पाहुया त्याचा लोकाना मारताना ....

करू शकतो का हो असा काही कायदा?

आमचे थोरले महाराज असते तर लगेच पास केला असता हा कायदा... गुन्हेगाराना शिक्षा आणि जरब बसण्यासाठी त्यानी काय केले हे इतिहास वाचताना कळतेच... पण आता महाराज नाहीत .... त्यांच्या जबरी शिक्षा नाहीत ....फक्त गुन्हेगार मात्र उरलेत ... मोकाट !

६ टिप्पण्या:

Ajay Sonawane म्हणाले...

खरं आहे तुझं, खुप लाड चालवलेत त्याचे, खुप राग येतो रे या सगळ्यांचा, आपण असं कसं सगळं सहन करतोय हेच समजत नाही कधीकधी.
हेच बघ ना. स्वाइन फ्लु ने लोक मरत आहेत दररोज नव नवीन लोक स्वाइन फ्लु च्या विळ्ख्यात सापडत आहे, पण आपल्या सरकार कडुन काहीच ठोस पावले उचलली जात नाहीयेत. लोक अक्षरक्षः पॅनीक झालेत पण सगळे पुढारी जे तोंड लपवुन बसलेत. राग येतो या सर्वांचा.

Vishal Kalel म्हणाले...

शांत व्हा महाराज. माफी असावी.
तुमचा उफाळलेला राग आम्ही समजू शकतो. त्या कसाबचा अंगठा तोडून काही अतिरेकी कारवाया थांबणार नाहीयेत. किंवा फाशी देऊनही! अशा गोष्टी थांबवायच्या असतील तर थोडा वेगळा विचार करायला हवा. माझ्या मते आपल्याला गरज आहे ती एक सुजाण positive आणि powerful media ची. आपली वर्तमानपत्रे रद्दीच्या लायकीची.. आणि न्यूज चानल news नाही तर करमणूक करतात. खरी परिस्थिती पोहोचताच नाही लोकांपर्यंत.. होते ती फक्त दिशाभूल आणि करमणूक.. we need very radical change in the media!!!

भानस म्हणाले...

हा प्रश्न एकट्या कसाबचा नाहीये, या भयंकर प्रवृत्तीचा आहे ना रे.न्यूज चॆनलना स्वत:ची तुंबडी भरायची आहे तेव्हा ते मूर्खासारखी एकाच गोष्टीची रट दिवसभर लावत बसतात. कायद्यातही बदल हवाच आहे. किमान अतंर्गत गुन्हेगारी-हिंसाचार बंद होईल असा जबर कायदा हवा. जसा मिडल-इस्ट मध्ये आहे. कसाबचे हसू अन बेदरकार बोलणे ऐकून फार त्रास होतो.

Pravin म्हणाले...

शांत व्हा बाजीराव :) बाकी तू लिहीलेलया शिक्षा जबरदस्त आहेट. माझ्याही डोक्याट कही जबरी शिक्षा आहेत परन्तू इथे लिहिता येणार नाहित :)

Harshal म्हणाले...

तुमच्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद ! तसा मी शांतच आहे हो ... काळजी नसावी :)

माझा या शिक्षा लिहिण्याचा मतितार्थ येव्ह्ढाच की गुन्हेगाराना कायद्याची जरब असावी ... जेणे करून कोणीही गुन्हा करण्या अगोदर विचार करेल ... आणि गुन्ह्यांचे प्रमाण काही प्रमाणात कमी होइल...नुसता तुरुंगवास आणि तथाकथित सक्त्मजूरी काहीही कामाची नाही.

Vishubhau म्हणाले...

राजे,
धन्यवाद..... जबरदस्त आग ओकली आहे...

आपला,
(श्रीमंत) विशुभाऊ