सोमवार, २८ सप्टेंबर, २००९

लल्लाटी भंडार...

गेला महिनाभर मरणाचा बिझी होतो... आत्ता आत्ता थोडी उसंत मिळतेय.

काल "जोगवा" पाहिला. आणि एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. मराठी सिनेमा बदलतोय. सर्व कसं चकचकीत झालंय.
आणि त्या चकचकीतपणा बरोबर आपली माणसे सिनेमा मध्ये उत्कृष्ट विचार हि देतायत. चाकोरी बाहेर जाऊन वेगळा विचार मांडतायत. त्या हाडीप्पा फाडीप्पा आणि wanted fanted पेक्षा खूप चांगलं बनतंय मराठीत.

"जोगवा" सिनेमा हि या सगळ्या गोष्टीत चपखल बसतो. वेगळी कथा, सकस अभिनय आणि नेहमी प्रमाणे मराठी चित्रपटात न ऐकू येणारा sound असलेली अजय अतुल यांची गाणी. हि दोन माणसे भन्नाट काम करतायत.

जोगवा मध्ये मला जाणवलेली एक गोष्ट म्हणजे सगळी पात्र अभिनय छान करतात पण त्यांचे अन्याय सहन करण्याची वृत्ती पटकन convince होत नाही. म्हणजे ती माणसे जास्त विरोध न करता जोगता आणि जोगतीण बनून जातात. दोन्ही पात्र थोडी बंडखोर आहेत, थोडी धीट आहेत, तायप्पा (उपेंद्र लिमये ) तर गाव बाहेर नोकरी हि करून आलाय. मग जेंव्हा त्यांना तथाकाथित समाजाबाहेर काढलं जातं.... तेंव्हा त्यांचा विरोध अजून परिणामकारक दाखवायला पाहिजे होता. (ती पळून का जात नाहीत असा हि विचार माज्या मनात आला. )

वरील माझे हे विचार चित्रपट पाहताना फ़क़्त जाणवतात , ते खटकत नाहीत.
कारण चित्रपटाची बांधणी अशी केली आहे कि तुम्ही त्यात पूर्ण गुंगून जाल. त्या गावातल्या माणसांची, अंध श्रद्धेने उध्वस्थ केलेल्या माणसांची गोष्ट तुमच्या मनाला कुठेतरी लागून राहील.... एवढं नक्क्की. किशोर कदम , उपेंद्र लिमये यांचा अभिनय तर एकदम जबरदस्त !!!! पार्श्व संगीत, छाया चित्रण एकदम पाहण्यासारखं ....

चित्रपट संपल्यावर माज्या डोक्यात उरलं ते म्हणजे कसली तरी वेगळीच चेतना देणारे "लल्लाटी भंडार... " हे गाणे आणि त्यावर हळदीने माखलेला बेभान होऊन चोन्ड्के (एक ग्रामीण वाद्य ) वाजवणारा उपेंद्र लिमये.

थोडक्यात सांगू का ... हा चित्रपट थेटरात जाऊन पहा .... उगाच कशाला वेळ लावायचा हे वाचण्यात ?

ता.क. : किशोर कदम पण डोक्यात राहतो... त्यांच्या अभिनयाला सलाम !

३ टिप्पण्या:

Kanchan Karai (Mogaraafulalaa) म्हणाले...

मराठी चित्रपट थिएटरमधेच जाऊन पहावा. हा चित्रपट पहायचा राहिलाय. सुखांत पहायचाय. आता तर ह्या महिन्यात कितीतरी चांगले चित्रपट पहायचेत. नटरंग, झेंडा, शिक्षणाच्या...

आत्ता, लल्लाटी भंडार ऐकते आहे.

Harshal म्हणाले...

aabhar कांचन ... tujya feedback baddal !

सागर म्हणाले...

माझ आवडत गाण :)
अजय अतुल रॉक्स