रविवार, १ नोव्हेंबर, २००९

माझी पहिली विडियो फिल्म

हल्ली नवीन काही लिहावसं वाटतच नाही... त्या मुळे काही लिहिलेले नाही. सर्व ठीक चाललय, काम पण बरच असतं हल्ली ....

रविवारी सहज चाळा म्हणून जुन्या विडियो क्लिप्स घेतल्या आणि त्यात एक गाणे background ला टाकले...विडियो बरोबर खेलण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न ... मी तरी हे बनवताना लागलेले २ तास एन्जॉय केले. तुम्हालाही आवडेल अशी आशा करतो... पण बघायच्या आधी स्पीकर चालू करायला विसरु नका...विडियो जागेवरच पूर्ण डाउनलोड होऊ दया अणि मगच प्ले करा नाहीतर तुटक तुटक चालले की मजा जाते ... असा माझा अनुभव आहे.

गणपतीला आमच्या गावच्या एकत्र घरात जमणार्या माझ्या काक्या, माझी आई, बाबा, आणि खुप चुलत काका, काक्या, भावंड या विडियो मधे आहेत... तशीच माजी बायको पण आहे। ती आपले मनोगत या गाण्यातून सांगते अशी कल्पना आहे कारण तिचा हा पहिलाच गौरी गणपतिचा सण होता, मग फ़ुगड्या, झिम्मा, गाणी बरच काय केलन तिने. सुरुवातीला गाडीत झोपलेली आहे तीच आहे सौ.रुचिरा हर्षल चव्हाण.