मंगळवार, १५ डिसेंबर, २००९

देवमाणसे

नटरंग ची गाणी सारखी सारखी हेडफोन वर ऐकून बहिरे पण आले तर "अजय अतुलना " जबाबदार धरता येईल का?
दिवस भर काम ना करता नुसती गाणी ऐकली आणि ऑफिस मधून नको तिथे लाथ मिळाली तर
"अजय अतुलना " जबाबदार धरता येईल का?
समस्त वाचकहो कसली भन्नाट गाणी दिलेत हो ह्यानी ... ठार वेडे झालो आम्ही ... आनंद यादवांची "नटरंग" कादम्बरी वाचून मी खुप अपसेट झालो होतो...खुप त्रास झाला वाचायला ... अजुनही त्याचा शेवट वाचलेला नाही... पण आज एक मुलाखती मधे वाचला की चित्रपटात शेवट सुखद केल आहे... त्यामुले जिवाला जरा बर्र वाटलं... पण या सिनेमतिली गाणी मात्र अगदी फेटे उडावु झालीत... काय सांगू आणि काय नको ... खेल मांडला सारखा अप्रतिम गाणे... कादंबरी वाचल्या मुले मला जरा जास्तच भावलं... "अप्सरा आली" गाण्यात गुरु ठाकुर चे शब्द ...थेट राम जोशींची आठवण करून देतात...


खेळ मांडला या गाण्यात जेंव्हा खालील ओळी येतात तेंव्हा अजय अतुल चे मोठे पण कळते !
काय काळीज कापू चाल दिलेय !!!

सांडली गा रीतभात |

घेतला वसा तुझा |
तूच वाट दाखीव गा |
खेळ मांडला ||

दावी देवा पैल पार |
पाठीशी तू रहा उभा |
ह्यो तुझ्याच उंबर्यात

खेळ मांडला ||


आणि गाण्यातला शेवटचा ठेका ... काय सांगू महाराजा !!!!
काळजाचा ठेका चुकतोय ऐकता

वा !! अजय अतुल काय हा जीवघेणाखेळ मांडला आहात तुम्ही ! तुम्हालामनाचा मुजरा ... देवमाणसे तुम्ही !

आणि वाचकहो असली मूल्यवानगाणी काही मूल्य देऊन खरेदी कराडाउनलोड करत
... बसुनका... हात जोडून विनंती ...