मंगळवार, १५ डिसेंबर, २००९

देवमाणसे

नटरंग ची गाणी सारखी सारखी हेडफोन वर ऐकून बहिरे पण आले तर "अजय अतुलना " जबाबदार धरता येईल का?
दिवस भर काम ना करता नुसती गाणी ऐकली आणि ऑफिस मधून नको तिथे लाथ मिळाली तर
"अजय अतुलना " जबाबदार धरता येईल का?
समस्त वाचकहो कसली भन्नाट गाणी दिलेत हो ह्यानी ... ठार वेडे झालो आम्ही ... आनंद यादवांची "नटरंग" कादम्बरी वाचून मी खुप अपसेट झालो होतो...खुप त्रास झाला वाचायला ... अजुनही त्याचा शेवट वाचलेला नाही... पण आज एक मुलाखती मधे वाचला की चित्रपटात शेवट सुखद केल आहे... त्यामुले जिवाला जरा बर्र वाटलं... पण या सिनेमतिली गाणी मात्र अगदी फेटे उडावु झालीत... काय सांगू आणि काय नको ... खेल मांडला सारखा अप्रतिम गाणे... कादंबरी वाचल्या मुले मला जरा जास्तच भावलं... "अप्सरा आली" गाण्यात गुरु ठाकुर चे शब्द ...थेट राम जोशींची आठवण करून देतात...


खेळ मांडला या गाण्यात जेंव्हा खालील ओळी येतात तेंव्हा अजय अतुल चे मोठे पण कळते !
काय काळीज कापू चाल दिलेय !!!

सांडली गा रीतभात |

घेतला वसा तुझा |
तूच वाट दाखीव गा |
खेळ मांडला ||

दावी देवा पैल पार |
पाठीशी तू रहा उभा |
ह्यो तुझ्याच उंबर्यात

खेळ मांडला ||


आणि गाण्यातला शेवटचा ठेका ... काय सांगू महाराजा !!!!
काळजाचा ठेका चुकतोय ऐकता

वा !! अजय अतुल काय हा जीवघेणाखेळ मांडला आहात तुम्ही ! तुम्हालामनाचा मुजरा ... देवमाणसे तुम्ही !

आणि वाचकहो असली मूल्यवानगाणी काही मूल्य देऊन खरेदी कराडाउनलोड करत
... बसुनका... हात जोडून विनंती ...

१० टिप्पण्या:

भानस म्हणाले...

गाण्यांबद्दल व अर्थात सिनेमाबद्दलही बरेच ऐकलेय.गाणी आवडलीत.:) सिनेमाही आवडेलच.आमचा अतुल हाय नव्हं का त्यात.आता पाहायला कधी गावतुयां कोन जानं.बाकी पोस्टची सुरवातीची वाक्ये सही आहेत.

LaVish aka vishal kalel म्हणाले...

रेहमान आला हो आला... मराठीत.!
जे कान तमिळ, हिंदी आणि इंग्रजी मध्ये ऐकत होते ते सांगीतिक वादळ आता मराठीमध्येही पोहोचले आहे.
अजय-अतुल यांनी अतुलनीय कामगिरी केली आहे नटरंग मध्ये.. शब्दच अपुरे पडत आहेत कौतुक करायला.
जोगवा मधील गाणी पण आवडली होती पण नटरंग ने पार वेडे केले आहे. आणि आता निदान घरचे लोक मी मराठी गाणी ऐकायला लागलो म्हणून खुश तरी होतील. (आमच्या गल्लीतील दहावी-बारावीची पोरे माझ्या लाउड-स्पीकरवर वाजणाऱ्या तमिळ गाण्यांनी हैराण व्हायचे!)
अजय-अतुल यांना मानाचा मुजरा!!!

nikheel म्हणाले...

Hi Harshal,
very interesting blog..after a long time got to read/see about marathi world.
Thanks by stopping by, keep blogging and keep visiting leehkin.

Rekha Thorat म्हणाले...

Hi Harshal!
Thank you for stopping by and sweet words. Glad that u enjoyed the drawing. And I am glad that I found your blog. :)
Faarach chaan aahe!

Navin Varshachya Hardik Shubechya.

Punha Bhetu,
Rekha.

Tushar Phatak म्हणाले...

भाऊ . . बरेच दिवस बर्याच वेळा ब्लोगवर येऊन गेलो . . मला वाटल कि बंद वगेरे केलास कि काय . . . लिहित जा रे . . तू भारी लिहतोस . .

कांचन कराई म्हणाले...

अजय अतुलचं संगीत म्हणजे देवाला मनापासून घातलेली साद वाटते. त्यांची गाणी ऐकताना ब-याचदा डोळ्यातून आपसूक पाणी येतं. मी तर अप्सरा ऐकताना सुद्धा रडले. ती लावणी आहे की स्तुतिगान, हेच मला कळेना! केवळ अप्रतिम!

कांचन कराई म्हणाले...

शेवट्च्या पायरसीविरोधी निवेदनासाठी आभार. पायरसीचं दु:ख एका कलाकारालाच कळू शकतं.

Anand म्हणाले...

अतिशय सुरेख गाणी आहेत.
मानलं बुवा अजय-अतुल ला.

राज जैन म्हणाले...

mast lihale aahes....

gaani tar apratim aahet..

aavadale.

JAy म्हणाले...

Ha chitrapatchya babatit sagalyach goshti apratim aahet..