गुरुवार, ११ नोव्हेंबर, २०१०

Texas chainsaw Masscare

Texas chainsaw Masscare (टेक्सास मधलं यांत्रिक करवतीने ने केलेले हत्याकांड असा अर्थ असावा ...असणारच) हा सिनेमा मला जास्त आवडला ... इतर सर्व इंग्रजी सिनेमान्सारखाच तो होता तरी तो जास्त आवडला ... डोक्यात राहिलं कायमचा का तेच शोधण्याचा प्रयत्न ....
पी सी वर इयर फोन लावून एकट्याने मी खूप चित्रपट पाहिलेत त्याची सुरवात बहुदा या सिनेमानेच झाली .... मला भयपट, हॉरर, सायकोपट भयंकर आवडतात ...म्हणजे एकच विषय पण तो वेगळ्या वेगळ्या पद्धतीने कसा मांडलाय हे पाहणं मला अभ्यासाचा विषय वाटतो... सध्या मी "मशिनीष्ट" चा मनापसून अभ्यास करतोय. तर टेक्सास मध्ये सुरवातीचे जे दृश्य येतं ज्यात व्यान मध्ये बसलेले ४/५ मित्र एका निर्जन पण हिरव्या गार रस्त्यावरून चाललेत (अशी सुरुवात असली कि मला जाम मजा येते..(पहा wrong turn १, hills have eyes 1, jipper cripper, haute tension, shaitan (french)) )... आणि अचानक एक पोरगी त्यांच्या गाडीखाली मरता मरता वाचते... पोरं तिला गाडीत घेतात आणि जे काय प्रकार सुरु होतात .... ते मला भयंकर आवडलं... सिनेमात मग हे लोक एका भिकारचोट घरात...(त्या एकाकी घराचे संध्याकाळच्या उन्हात जे लोंग शॉट घेतलेत ते मला का माहित पण फार मनहूस वाटले।) आश्रय घेतात...तिथे असतात ...माणसांना मारून खाणारी एकदम चारी ठाव स्वयंपाक करून शिजवून खाणारी माणसे ... आणि एक पाळीव वेडसर हिंस्र माणूस जो बिनडोकपणे मालकाने सोडला कि कुत्र्यासारखा समोरच्या माणसाला आपल्या यांत्रिक करवतीने कापूनच काढतो ... सिनेमात हे जे काय प्रकार दाखवलेत ते काही वेळा अंगावर शहारे आणतात या सगळ्यात महत्वाची गोष्ट मला वाटली आणि आवडली ती म्हणजे हे सगळे करण्यामागे त्यांनी त्याची कारणे पण दाखवलीत (जास्त डीटेल मध्ये Texas chainsaw Masscare - the begining (हा याचा नंतर आलेला मागचा भाग) यात दाखवलंय) उगाच दाखवायचं म्हणून काहीही विक्षिप्त दाखवलेले नाही...मी तरी त्यांचा राग समजू शकलो. हे सगळं लिहिलेले जाम पुचाट झालंय पण सध्या असंच सुचतंय ... वाटतंय तसाच लिहिलंय .... पुन्हा वाटलं तर पुन्हा लिहीन. हल्ली मला कंसात कंस घालायची बेक्कार सवय लागतेय हे एक विशेष.

शुक्रवार, २२ ऑक्टोबर, २०१०

(मनोगत) सखिये ... DSLR वर रहमानचे गाणे चित्रित करायचा प्रयत्न.

सरळ मुद्द्यावर येतो.हे गाणे फार जुने "अन्दीमन्दारय" या तमिळ चित्रपटातले आहे... या गाण्याने काही महिने माझा कब्जा घेतला होता. गाण्यातले शब्द काय आहेत किंवा त्याचा अर्थ हा मुद्दा ... रहमानचे गाणे असल्यामुळे गौण ठरतो...त्यात असलेल्या भावना...एक हि शब्द न कळता... काळजाला भिडतात...

ह्या गाण्यात ओले वातावरण आहे... रहमानने खूप ओली गाणी बनवली आहेत... (उदा. इंदिरा मधला "थोडा थोडा", इरूवर वैगरे) ...प्रियकर आपल्या प्रेयसीच्या आठवणीने व्याकूळ झालेला आहे.... तो तिला आठवतोय ...तिचं वर्णन करतोय... या गाण्याचे नाव सखिये असलं...तरी या चित्रात ती दिसत नाही... उगाच अपेक्षा ठेवू नका :) मी आवडत्या मुलीची आठवण काढणारा मुलगाच फ़क़्त दाखवलाय. आणि गाणं ऐकताना जे जे डोळ्यासमोर दिसलं ते तसंच चित्रित करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय. या गाण्यात निसर्ग हा महत्वाचा घटक ठरलाय....त्या मुला पेक्षा...

हे गाणं बनवताना माज्याकडे कोणी हि कलाकार नवते...शेवटी माझा भाऊ सुशील मदतीला धावला. त्याने हि आपल्या परीने भूमिकेत शिरायचा प्रयत्न केला होता. शेवटी आम्ही कोणी फुल time अक्टर डिरेक्टर नाहीत. सुशील कढून जास्त अक्टिंग करवून घेतली नाही कारण २ दिवसात त्याला मुंबई गाठायची होती. त्यामुळे जसं जमलं तसं केलं. पण सुशील ने फार फार मेहनत घेत्लीय. दूर दूर चालत जायचा...कुठे हि रानात उतरायचा... Hats ऑफ brother !!!

आणि अजून थोडं ... कारण त्याचा उल्लेख मला करायलाच पाहिजे... माझा अजून एक भाऊ "ऋषी" त्याने अभ्यास टाकून मला माज्या गावाच्या अवती भोवती न थकता बाईक ने फिर फिर फिरवलं...लोकेशन साठी ... मी त्याला फ़क़्त सांगायचो मला ना असं गवत..पाणी ... असं वातावरण पाहिजे...सांगितलं रे सांगितलं कि हा पठ्या बाईक बर किक मारून तय्यार. :) खूप खूप मदत झाली ऋषी तुझी...

पकवलं... आत्ता गाणं बघा ... पूर्ण लोड करून घ्या ... speaker / हेडफोन चा आवाज चेक करा ... गाण्यातल्या भावना समजून घ्या... शब्द नाही कळले तरी... फील करून घ्या... चुका काढा... comment तर जरूर टाका...त्याशिवाय काय अर्थ आहे ? ;)

मला जितका या गाण्याने आनंद दिला ऐकताना आणि बनवताना....तो तुम्हाला हि मिळो...असं मनापासून सांगावसं वाटतं.

जय रहमान !सखिये (Sakhiye) visual interpretation of a classic A.R.Rahman's song from Harshal chavan on Vimeo.स्लो नेट स्पीड असेल तर तुम्ही इथे ही पाहू शकता. (low resolution )

गुरुवार, २३ सप्टेंबर, २०१०

बरेच दिवस झाले !

खुप दिवस झाले काही लिहिलच नाही... नेहमी लिहायला हवच असा काही नियम नाही ... आज मात्र काही तरी लिहवस वाटतय... बरेच दिवस माझ्या आवडत्या सिनेमां बद्दल लिहायचा होतं... ते सगळ्यांनाच आवडतील असे नाही पण... मला भरपूर आवडलेत ...मग प्रश्न मिटला...

"सत्या" आणि "टेक्सास चेनस्वा मसेकर (texas chainsaw massacre part 1 and 2) "

बघू किती आणि कश्या पद्धतीचे लिहिता येतेय ते.

गुरुवार, २० मे, २०१०

canon 550D घेतला

canon 550D घेतला ...दिवस रात्र त्याच्यावरच प्रयोग करत असतो... दुसरे काही सुचत नाही... जोपर्यंत समाधानकारक शोर्ट फिल्म बनत नाही तोपर्यंत सुख समाधान नाही... असो..
हा जो क्यामेरा आहे त्यात HDvideo शूट करता येतात (त्यासाठीच घेतलाय तो ..) तर आणल्या आणल्या ... मी काहीही सेट न करता हे चित्रित केलं. मग चुकत माकत video एडीट केला... पार्श्व संगीत टाकलं
आणि अश्या रीतीने फिल्म मेंकिंग (फार भारी शब्द वाटतोय का? असो...) ला सुरुवात केली... बघा आणि चांगला ... वाईट ....अभिप्राय द्या... :)

सोमवार, ३ मे, २०१०

जय महाराष्ट्र !

मला माहिती आहे फार उशीर झालाय हे पोस्ट कारायला पण तरीही... मी केलेली calligraphy "महाराष्ट्र दिना" निम्मित ... शेयर करतोय ... जय महाराष्ट्र !

सोमवार, १५ मार्च, २०१०

न्यूनगंड

मराठी पालक आपल्या मुलांना मराठी शाळेत घालतील, त्यांना इंग्रजी भाषेचा न्यूनगंड सतावणार नाही... इंग्रजी म्हणजे प्रगती ... आणि मराठी (किंवा कोणतीही प्रादेशिक भाषा ) म्हणजे अधोगती ...इंग्रजी फाड फाड बोलता नाही आले तर आमचे मुल या जगात पिछाडीला राहील... अशी गुलामगिरीची भावना, भयगंड, न्यूनगंड, मनोविकार ... लोकांच्या मनातून या वर्षी तरी निघून जाईल हीच नवीन मराठी वर्षाकडून अपेक्षा .... निर्भय बना आई बापानो !!!

रविवार, ३ जानेवारी, २०१०

नवीन वर्षाची सुरुवात उत्साहाने नको !

नवीन वर्षाची सुरुवात उत्साहाने नको तर चांगल्या मनाने करा कारण उत्साह हि कितीही सकारात्मक ( positive ) भावना असली तरी ती तात्पुरती असते. उत्साह कधीतरी मावळतोच.... त्यापेक्षा नवीन वर्षाची सुरुवात चांगल्या,स्वच्छ, पूर्व ग्रह्दुशीत नसलेल्या मनाने करा... देवाने तुम्हाला एक नवीन कोरे करकरीत वर्ष दिलेय... गेल्या वर्षी टाळलेल्या , मनाला पटून हि ना करता आलेल्या सगळ्या गोष्टी आठवून बघा ... मन आणि बुद्धी याचा सारासार विचार ठेवून त्या गोष्टीना सुरवात करा... काहीतरी वेगळे करा... किंवा जे करताय ते मनापासून करा ... आवडते काम असो वा नावडते ... ती कामगिरी स्वच्छ कशी बजावता येईल हे पहा... याचा कधीतरी फायदा होतोच ... उगाच सोड्याची बाटली उघडल्या वर येतो तसला निरुपयोगी फससफसणरा उत्साह नको ... कारण त्या बूड बुड्यांचा बाटलीतून बाहेत आल्यावर काही हि उपयोग होत नसतो.

(नवीन वर्षाची सुरुवात मी तरी या विचारांनी केलेली आहे... मला माझेच हे विचार १००% पटलेत... तुम्हाला शुभेच्छा ! )