शुक्रवार, २२ ऑक्टोबर, २०१०

(मनोगत) सखिये ... DSLR वर रहमानचे गाणे चित्रित करायचा प्रयत्न.

सरळ मुद्द्यावर येतो.हे गाणे फार जुने "अन्दीमन्दारय" या तमिळ चित्रपटातले आहे... या गाण्याने काही महिने माझा कब्जा घेतला होता. गाण्यातले शब्द काय आहेत किंवा त्याचा अर्थ हा मुद्दा ... रहमानचे गाणे असल्यामुळे गौण ठरतो...त्यात असलेल्या भावना...एक हि शब्द न कळता... काळजाला भिडतात...

ह्या गाण्यात ओले वातावरण आहे... रहमानने खूप ओली गाणी बनवली आहेत... (उदा. इंदिरा मधला "थोडा थोडा", इरूवर वैगरे) ...प्रियकर आपल्या प्रेयसीच्या आठवणीने व्याकूळ झालेला आहे.... तो तिला आठवतोय ...तिचं वर्णन करतोय... या गाण्याचे नाव सखिये असलं...तरी या चित्रात ती दिसत नाही... उगाच अपेक्षा ठेवू नका :) मी आवडत्या मुलीची आठवण काढणारा मुलगाच फ़क़्त दाखवलाय. आणि गाणं ऐकताना जे जे डोळ्यासमोर दिसलं ते तसंच चित्रित करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय. या गाण्यात निसर्ग हा महत्वाचा घटक ठरलाय....त्या मुला पेक्षा...

हे गाणं बनवताना माज्याकडे कोणी हि कलाकार नवते...शेवटी माझा भाऊ सुशील मदतीला धावला. त्याने हि आपल्या परीने भूमिकेत शिरायचा प्रयत्न केला होता. शेवटी आम्ही कोणी फुल time अक्टर डिरेक्टर नाहीत. सुशील कढून जास्त अक्टिंग करवून घेतली नाही कारण २ दिवसात त्याला मुंबई गाठायची होती. त्यामुळे जसं जमलं तसं केलं. पण सुशील ने फार फार मेहनत घेत्लीय. दूर दूर चालत जायचा...कुठे हि रानात उतरायचा... Hats ऑफ brother !!!

आणि अजून थोडं ... कारण त्याचा उल्लेख मला करायलाच पाहिजे... माझा अजून एक भाऊ "ऋषी" त्याने अभ्यास टाकून मला माज्या गावाच्या अवती भोवती न थकता बाईक ने फिर फिर फिरवलं...लोकेशन साठी ... मी त्याला फ़क़्त सांगायचो मला ना असं गवत..पाणी ... असं वातावरण पाहिजे...सांगितलं रे सांगितलं कि हा पठ्या बाईक बर किक मारून तय्यार. :) खूप खूप मदत झाली ऋषी तुझी...

पकवलं... आत्ता गाणं बघा ... पूर्ण लोड करून घ्या ... speaker / हेडफोन चा आवाज चेक करा ... गाण्यातल्या भावना समजून घ्या... शब्द नाही कळले तरी... फील करून घ्या... चुका काढा... comment तर जरूर टाका...त्याशिवाय काय अर्थ आहे ? ;)

मला जितका या गाण्याने आनंद दिला ऐकताना आणि बनवताना....तो तुम्हाला हि मिळो...असं मनापासून सांगावसं वाटतं.

जय रहमान !सखिये (Sakhiye) visual interpretation of a classic A.R.Rahman's song from Harshal chavan on Vimeo.स्लो नेट स्पीड असेल तर तुम्ही इथे ही पाहू शकता. (low resolution )

९ टिप्पण्या:

Mugdha म्हणाले...

khupach chhan!!!!!!!!
Lovely..

Pankaj - भटकंती Unlimited म्हणाले...

परवा मंगेशने लिंक दिली होती. तेव्हाच निरोप पोचवला असेल त्याने माझ्या कमेंट्सचा. आज समजले की या व्हिडिओचे बाळंतपण तू केलंय ते :-)

बाकी सलाम आहे तुला.

Harshal म्हणाले...

Mangesh ne abbhar parat dile ka mahit nahi :) tyamule parat ekda abhar abhar abhar pankaj! tumha lokanchi comment mhanje thorlya maharajanchi ekhadya mavalyala shabaski ;)

Abolii म्हणाले...

sahi... agavar shahara ala...

Vikrant Deshmukh... म्हणाले...

खुप अप्रतिम..... जबरदस्त.... आपल्याला एकदम जास्ती आवडला !!!!!!!

सागर म्हणाले...

मस्त .पाऊस छान पकडला आहे.सुंदर

Pradeep garud म्हणाले...

mitra khup barawatala malapan shootng karayala aavadat pan vel nahi milat tasa prayatna kela hota pan tantrik adachani aalya loketion khup chan hoti tuzya pudhil mansubyasathi (project) mazya hardik subhecha
Ani jamalacha tar location cha pata kalav tuza aabhar rahin

tuza nava mitra
Pradeep garud(patil)
mr_pradeeppatilredimail.com

jayesh म्हणाले...

प्रत्यक्षाहुनी प्रतिमा सुंदर. very nice

अनामित म्हणाले...

अन्दिमन्दारै