मंगळवार, २२ फेब्रुवारी, २०११

कुठलं गाणं कशा साठी ऐकावं?

(noise reduction करणारा ear phone माझ्याकडे आहे (माझा आवडता Creative ६३० ) तुमच्याकडे तसल्याच प्रकारचा किंवा त्यापेक्षा चांगला ear phone असावा
एवढी अपेक्षा म्हणजे पुढे वाचण्याला अर्थ बिर्थ कारण गाण्यातल्या मायन्यूट हरकती इथे जास्त... तर ते कानात असताना जी गाणी ऐकली , त्याचं निरीक्षण )

कुठलं गाणं कशा साठी ऐकावं?


१) माझ्या मराठी मातीचा ...
याच्यात गाणं टिपेला पोचता तेंव्हा एक हाश्शशश्शशश्शशश्शश असा आवाज आहे... (भक्त गणासाठी time stamp : १:१०... एकदा ऐकून पटलं नाही तर जास्त वेळा ऐकावा लागेल...त्याला इलाज नाही)

२) पोराले -आनंदी (चित्रपट: करुथमा)
पाहिल्या अंतर्या मध्ये पार्श्वभूमीला हसत खिदळत धावणाऱ्या मुलींचा आवाज, आणि त्यांच्या बरोबरच पळणारे violine आणि नंतर येणारा लाडिक येलेले येलेले... (विशेष सूचना : हे शूट करण्या साठी "स्टेडी कॅम" जरुरीचा ) (भक्त गणासाठी time stamp : १:२६ )
दुसर्या अंतर्यात एकदा डाव्या कानाला एकदा उजव्या कानाला ऐकू येणाऱ्या बासरीचा आवाज (भ.ग. t : ३:५४ )

३) जबरदस्त (शीर्षक गीत)
या गाण्यात खूपच कमी ताशाचा आवाज वापरलाय..जो खूप आनंद देवून जातो (भ.ग. t : ०:५४)

४) आरोमले (विन्नी थान्डी वारुवाया )
या गाण्यात गायक "आरोमले" म्हणताना किती वेगवेळ्या प्रकारे पिळवटून बोललाय त्यावर बारीक लक्ष ठेवावे... (गाणं संपल्यावर आपल्याला खूप काही मिळालंय हे लोकांना कळू देऊ नये...गप राहावं आणि गाण आठवत राहावं ;) (भ.ग. t : देण्यात काही अर्थ नाही..)

५) नरुमुगाये (इरूवर)
सुरवातीचा मृदुंग ... त्यावरची थाप ... आणि अगरबत्तीच्या धुरा सारखी तरंगणारी करुण बासरी... (भ.ग. t : मिळणार नाही ...कंटाळा आला)

६) सक्कारा (न्यू)
वात्रट म्हणजे अगदी कार्टून छाप drums , "तवील" नावाचं ताल वाद्य (लग्नात बिग्नात असता बघा...), सनई, सगळा सावळा गोंधळ .... पण गंभीरपणे केलेला वात्रट पणा यहा पाया जाता है

७) महम मह माये (पुली)
"अलंटी हाय दि" हे गायिकेने उच्चारलेले शब्द ... अर्थात नुसते तेच ऐकू नका ..पूर्ण गाणं ऐकलात तर मज्जा ... (त्याचं अर्थ .. सेम हिअर, सेम हिअर ... म्हणजे त्या थोर पुरुषाला त्या थोर स्त्री बद्दल ज्या भावना वाटतात त्याच भावना त्या थोर स्त्रीला थोर पुरुषाबद्दल वाटतात, म्हणून ती उच्चारते "इकडे पण असंच, इकडे पण असंच" ) (भक्त गणांनी कृपया शांत राहून गाणं ऐकण्याची कृपा करावी, मंडपाजवळ गोंधळ घालू नये ... नाहीतर प्रत्येकाच्या वडिलांना... घरी जाऊन नाव सांगावं लागेल...) असो शेवटचा कंस वाचल्या न वाचल्या सारखा करावा...

८) एन विटट तोटटतील (gentelman )
गाण्यातील intruldes...गाण्यातील intruldes...गाण्यातील intruldes... अगदी तमिळ हिरव्या गार गावातलं घर ... केळीचं सुवासिक हिरवं पान त्यावर ठेवलेला वाफाळलेला भात ... पितळेच्या पिवळ्या ... चकाकणाऱ्या स्वछ भांड्यात ठेवलेल्या पांढर्या शुभ्र इडल्या ... ही सगळी चित्र डोळ्यासमोर दिसली नाहीत ..... तर सकाळी फिरायला जाताना एकदा ...दुपारी जेवून झाल्यावर २ वेळा आणि रात्री बिछान्यात पडल्या पडल्या नशिबाला दोष द्यावा... अजून मी काय सुचवू ... ;) मी किती ताप घेणार डोक्याला ना? असो ...

९) इन्नवले अडी इन्नवले ( सून री सखी मेरी प्यारी सखी .. "हमसे है मुकाबला" तमिळ मध्ये "कादलन ")
गायकाचा आर्त आवाज... पार्श्वभूमीला वाजणाऱ्या .... (किणकिणणार्या हाच शब्द योग्य ) असंख्य छोट्या मोठ्या घंट्या ... आणि खास दक्षिणात्य स्त्रियांचा कोरस... एका वेळी एक ऐकलंत तरी चालेल ...बघा जमतंय का?

एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो ...
तुम्हाला काही लिहायचं असल्यास तुम्ही ही लिहू शकता ...

रविवार, ६ फेब्रुवारी, २०११

किन्नरीचे बोरन्हाण...

तुमचे earphone...speakers लावून मगच बघा...