शुक्रवार, ८ फेब्रुवारी, २०१३

घर्रर्र्रर्रर्र्रर्रर्र्रर्रर्र्रर्रर्र्रर्रर्र्रर्रर्र्रर्रर्र्रर्रर्र्र

नेहमी प्रमाणे फोटोशॉप मध्ये धुमाकूळ माजवून ...क्लिक क्लीकाट करून येडझव्या  client आणि अर्धवट डिजाइन सेन्स असलेल्या मार्केटिंग च्या एमबीएन्चे समाधान करून तो ऑफिस मधून निघाला पिवळ्या धम्मक दिव्यांनी भरलेल्या सुनसान रस्त्यावर चा शुकशुकाट त्याची वाटच पाहत होता ....तो industrial एरिया असल्यामुळे तिथे ८ नंतर शुकशुकाट रहायला येत असे ... पिवळसर प्रकाश असलेल्या रस्त्यावरचा काळा शुकशुकाट ...

मळकट चिंध्या सारखे राखाडी रंगाचे केस असलेले रिक्षावाले त्याच्याकडे संशयाने पहायला लागले...हाच तो घरापर्यंत रिक्षा नेणारा... आत्ता आपल्याला हा नेहमीचा प्रश्न विचारणार ... कुठल्या तोंडाने याला हो म्हणायचा ....आपल्याला तर याच एरियात रिक्षा फिरवून जीवन साजरं करायचंय  ....लांबचं भाडं दुष्मनाला मिळो ....त्याने पहिल्याच रिक्षावाल्याला विचारले मीरा रोड...? आणि रिक्षावाला संमोहित असल्यासारखा "हो" म्हणाला....त्याला आश्चर्य वाटले आणि बरे हि लहान लहान गोष्टीत त्याला हल्ली फार चिंता वाटत असे...रिक्षाची चिंता मिटली होती... लाल भडक डोळे असल्यासारखे आकडे असलेला तो लोखंडी चेहरा १५ आकडा दाखवू लागला....आणि रिक्षा खड्ड्यातून उडत उडत निघाला पण .... हल्ली थंडी पडू लागली होती ... एखादा अनोळखी नातेवाईक खूप दिवस अनपेक्षितरित्या घरात तळ ठोकून बसल्यासारखी हि थंडी हल्ली बरेच दिवस त्याला रात्री गारठवत होती...रिक्षात तो बरोबर मध्यभागी बसला होता ...रिकाम्या रिक्षात तो बरोबर मध्ये बसत असे ....एका रिक्षावाल्याने त्याला एकदा तसे सांगितले होते तेंव्हा पासून तो तसाच बसायचा .... दोन्ही दरवाजातून थंड हवा ओरबाडत होती  ....  मध्ये अंग चोरून दोन्ही बाजूचे हल्ले सहन करत तो बसला होता घर्रर्र्रर्रर्र्रर्रर्र्रर्रर्र्रर्रर्र्रर्रर्र्रर्रर्र्रर्रर्र्रर्रर्र्र....रिक्षावाला खड्ड्यांची पर्वा न करता गाडी सुसाट पळवत होता .... खड्ड्यांची काळजी घेऊन रिक्षा चालवणारा माणुस भेटून त्याला साडेतीन वर्ष झाली होती .... रिक्षावाल्यांची त्याला चीड हि होती कधी कधी त्यांचे प्रश्न त्याला समजल्यासारखे हि वाटायचे पण हल्ली तो काही भांडणे करत नसे...घर्रर्र्रर्रर्र्रर्रर्र्रर्रर्र्रर्रर्र्रर्रर्र्रर्रर्र्रर्रर्र्रर्रर्र्र.....असंख्य निरनिराळ्या प्रकारच्या गाड्या दोन्ही बाजूनी पळत होत्या ...काहीना रिक्षा मागे टाकत होती .... काही रिक्षाला मागे टाकत होत्या .... आणि अचानक डीवायडर फोडून एक स्कोर्पिओ त्याच्या रिक्षाला आदळली .....ह्याला कळलाच नाही रिक्षाचा पिंजरा झाला .... लोक मदतीला आले याला जास्त लागला नव्हता .... याने पण जास्त विचार केला नाही....घर्रर्र्रर्रर्र्रर्रर्र्रर्रर्र्रर्रर्र्रर्रर्र्रर्रर्र्रर्रर्र्रर्रर्र्र.....रिक्षा आत्ता सुपर फास्ट झाली होती .... मधेच रिक्षाच्या खाली एक ३ वर्षाची मुलगी रस्ता क्रोस करत असताना आली .... तिला बसलेला धक्का इतका जबरदस्त होता कि ती दूर १० फुट फेकली गेली ... तो पुढे जाऊन त्याने त्या मुलीला पाहिलं तर तिचा डावा हात डिस्लोकेट झाला होता...याचा पण झाला होता.... मोजून ५ वेळा....या वेळी पण त्याने जास्त विचार केला नाही... घर्रर्र्रर्रर्र्रर्रर्र्रर्रर्र्रर्रर्र्रर्रर्र्रर्रर्र्रर्रर्र्रर्रर्र्र....त्याला नेहमी वाटणाऱ्या भीतीदायक विचारांमध्ये तो  रमला होता ... पुढे त्याची रिक्षा प्रचंड वेगामुळे नेहमीप्रमाणे काहीही कारण नसताना...उलटी होऊन पुढे फरफटत गेली... बहुदा पुढचे चाक निखळले असेल ....एकदा खरेच तसे निखळले होते पण रिक्षा उलटी बिल्टी नव्हती झाली पुढचे सर्व इमजिनेशन याचे होते.... हा मेला होता...कि जखमी होता हे त्याला कधी काळात नसे.....कारण तो तेव्हढाच विचार करत असे....घर्रर्र्रर्रर्र्रर्रर्र्रर्रर्र्रर्रर्र्रर्रर्र्रर्रर्र्रर्रर्र्रर्रर्र्र......रिक्षा धावत होती सगळा जग मागे टाकत होती ..... त्याला विरळ वस्तीच्या जवळ एक बेवडा दिसला जमिनीवर पार आडवा पडला होता सगळ्या जमिनीवर पडलेल्या बेवड्यानसारखे याने पण हाफ शर्ट आणि हाफ प्यांट घातली होती .... लहानपणापासून याने पहिले होते जे पण बेवडे असतात आणि ते जेंव्हा टाईट होऊन जमिनीशी प्रेम करू लागतात तेंव्हा तेंव्हा ते हाफ प्यांट मधेंच असतात .....कित्येक बेवडे त्याने पहिले होते....या बेवड्याने हिरव्या रंगाची प्यांट घातली होती ...हिरव्या रंगाची प्यांट...द्याध्ये त्या बेवड्याचे त्याला कौतुक वाटले...हिरव्या रंगाची प्यांट घालणे सोपी गोष्ट नाही .... घर्रर्र्रर्रर्र्रर्रर्र्रर्रर्र्रर्रर्र्रर्रर्र्रर्रर्र्रर्रर्र्रर्रर्र्र......आज दुसर्या रिक्षातून येउन अचानक त्याला कोणी पकडला नाही .....हाही त्याचा एक विचार होता.... चालत्या रिक्षातून त्याला कोणीतरी ओळखेल आणि खाली उतरवेल....का त्याचे कारण तो कधी शोधू शकला नाही रिक्षातल्या लाल भडक आकड्यांनी शंभरी ओलांडली ....

आता घर जवळ आलं त्याला हायसं वाटू लागला....चेक्नाक्यावरचा तो घाणेरडा ट्राफिक , धूळ, मुजोर रिक्षावाले , गळ्यात पडणारे छक्के ,पोलिसांच्या नको त्या भागात नोटा सारून रस्त्याच्या मधेच मोठ मोठाले ट्यान्कर, ट्रक उभे केले होते ..... हा रिक्षातून उतरला आणि त्याने प्रत्येक अनधिकृत जागा अडवलेल्या ट्रक च्या खाली जाऊन बॉम्ब लावले...असे कित्येक वेळा त्याने केल होतं .... ट्रक वाले पण हैराण झाले होते साला इथे कर्ज काढून ट्रक घ्यायचे आणि रोज सकाळी येउन बघतो तर कोणीतरी ते उडवून कचरा करून टाकलेला .... त्याला एक दिवस खात्री होती कि एक दिवस असा येईल कि ट्रक वाले कंटाळून त्या जागेत अनधिकृत रित्या गाड्या पार्क करणार नाहीत .... मग तिथे गर्दी जमणार नाही... सगळं मोकळं होईल ...एक दिवस त्याने तशी पत्रके पण टाकली होती .... "यहा पार्क करोगे तो बम से रोज उडा देंगे " असा पोस्टर त्यानेच डिझाईन केला होता ... ब्ल्याक आणि व्हाईट रंगात ....त्याला तेच दोन रंग आवडायचे ..... त्याने बॉम्ब लावला ....जास्त विचार केला नाही घर्रर्र्रर्रर्र्रर्रर्र्रर्रर्र्रर्रर्र्रर्रर्र्रर्रर्र्रर्रर्र्रर्रर्र्र....रिक्षा वाल्याला नेमका लेफ्ट turn लो असा कधी सांगायचं याचा विचार त्याच डोकं कातरू लागला ....शेवटी त्याने सांगून टाकलं .... आगे से लेफ्ट turn लेना ...शोर्टकट है ..... २५६ रिक्षावाल्यांना त्याने हा शोर्टकट शिकवला होता ...हा २५७ वा ....घर्रर्र्रर्रर्र्रर्रर्र्रर्रर्र्रर्रर्र्रर्रर्र्रर्रर्र्रर्रर्र्रर्रर्र्र....त्या शोर्टकट वरच एकदा त्याच्या म्हणजे रिक्षावाल्याच्या रिक्षाचे पुढचे चाक निखळले होते.... कसली प्रचंड खड खड होऊन गाडी थांबली होती ...पण विशेष म्हणजे त्याला तेंव्हा काहीच वाटलं नव्हतं ....कारण ती घटना खरी होती...जर हे कल्पनेत झालं असतं तर imagination ला वाव होता...नाडीचे ठोके वाढायला वाव होता ... डोकं गच्च व्हायला वाव होता .... रिक्षा वाटेतले सगळे अडथळे पार करून त्याच्या बिल्डींग समोर थांबली ...याने पूर्ण पैसे दिले .... आत्मविश्वासाने तो खाली उतरला ....त्याला किंचित आनंद झाला होता ...रोज वाढणारा बिपी आज एवढं सगळं करून हि वाढला नव्हता.... तो सरळ घरी पोचला....घरी त्याच्या छोट्या चिंटू मामाने दरवाजा  उघडला...ती त्याची छोटीशी  मुलगी होती ...तिला पाहून त्याचा न वाढलेलं बिपी पण नॉर्मलला आलं .... तो माणसात आला.... खालचा रिक्षावाला पण नवीन भाडे घेऊन सुसाट हायवे वर उडू लागला...घर्रर्र्रर्रर्र्रर्रर्र्रर्रर्र्रर्रर्र्रर्रर्र्रर्रर्र्रर्रर्र्रर्रर्र्र

1 टिप्पणी:

amit म्हणाले...

ekadya goshticha faltu varnan na karta, mala je disala te tu asa lihila ahes ki tyche bhikarxxxx fetures tya vakyatacha yetat!! super